Samantha Prabhu: समांथा प्रभूची लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री

हा सिनेमा २०२२च्या शेवटी किंवा २०२३ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

Samantha Prabhu will entry in Bollywood with taapsee pannu
Samantha Prabhu: समांथा प्रभू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एंट्री

अभिनेत्री समांथा रूथ प्रभूने नुकताच ‘अरेंजमॅरेज ऑफ लव्ह’ हा तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सिनेमा साइन केला. त्यानंतर समांथा आता बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, समांथा आणि बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू एका वूमन सेंट्रिक सिनेमात एकत्र काम करणार आहे. समांथाचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा असणार आहे. स्रीकेंद्रीत या सिनेमात एका कणखर स्त्रिची कथा दाखवण्यात येणार आहे. समांथा आणि तापसी यांच्यासोबत सध्या या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दोघीही सिनेमात एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहेत. दोघींनाही सिनेमाचा विषय फार आवडला असून दोघींकडून सिनेमासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे. हा सिनेमा २०२२च्या शेवटी किंवा २०२३ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

समांथा प्रभूने याआधी मनोज वाजपेयी अभिनीत द फॅमिली मॅन २ या वेब सीरीजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर एंट्री केली आहे. या सीरीजमध्ये आत्मघाती मोहीमेवर श्रीलंकेच्या तमिळ मुक्ती सेनानी राझीच्या भूमिकेत समांथा दिसली होती.

समांथा अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे समांथा विग्नेश शिवनच्या रोमँटिक कॉमेडी ‘काथु वाकुल रेंद काधल’ या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात विजय सेतुपती आणि नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. २०२२मध्ये समांथाचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच श्रीजीत मुखर्जींच्या ‘स्पोर्ट्स ड्रामा’,’शाबाश मिठू’ या सिनेमात दिसणार आहे.

समांथा नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटामुळे चांगलीच चर्चेत आली होती. घटस्फोटामुळे ती अनेक दिवस सिनेसृष्टीपासूनही लांब होती. मात्र त्यानंतर तिने पुन्हा एकदा दमदार एंट्री करत अरेंजमॅरेज ऑफ लव्ह हा पहिला आंतरराष्ट्रीय सिनेमा साइन करत तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली.


हेही वाचा – Miss World 2021 : ‘मिस वर्ल्ड २०२१’ ग्रँड फिनाले रद्द, मानसा वाराणसीसह १७ जण पॉझिटिव्ह