समांथाशी जवळीक वाढवल्याने स्टायलिस्ट प्रीतम जुकलकरला ठार मारण्याची धमकी

samantha ruth prabhas stylist preetham jukalkar receiving death threats from naga chaitanya fans
समांथाशी जवळीक वाढवल्याने स्टायलिस्ट प्रीतम जुकलकरला ठार मारण्याची धमकी

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय जोडी अभिनेत्री समांथा आणि नागाचैतन्य यांच्या घटस्फोट झाला आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करत त्यांनी घटस्फोटाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केला. मात्र त्यांच्या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दोघांनी घटस्फोटाचे कारण स्पष्ट न केल्याने आत्ता बीटाऊनमध्ये उलट- सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. यानंतर समांथा एका फॅशन डिझायनरला डेट करत असल्याचा चर्चांना उधाण आलेय. मात्र समांथाने एक पोस्ट शेअर करत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

समांथा रुथ प्रभूचा स्टायलिस्ट प्रीतम जुकलकरला डेट करत असल्याचे म्हटले जातेय. पण नागा चैतन्यच्या काही चाहत्यांकडून प्रीतमला ठार मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची माहिती समोर येत आहेत. समांथा आणि प्रीतम एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांमुळे प्रीतमला या धमक्या येऊ लागल्यात.

स्टायलिस्ट प्रीतम समांथाचा जवळचा मित्र आहे. मात्र नागा चैतन्याच्या घटस्फोटाला समांथा आणि प्रीतममधील जवळीक कारणीभूत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. काही यूट्यूबरने प्रीतम आणि समांथासोबत प्रेमसंबंध असल्याचेही जाहीर केले. त्यानंतर आता प्रीतमला धमक्या येत आहेत.

प्रीतमने काही दिवसांपूर्वी महिलावरील हिंसाचाराच्य घटनेवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे प्रीतम चांगलाच चर्चेत आला. नेटकऱ्यांना प्रीतमला सोशल मीडियावर बरचं ट्रोल केले. मात्र काही चाहत्यांनी प्रीतमला समर्थन दिले आहे. मात्र आता नागा चैतन्य आणि समांथाच्या नात्यात प्रीतमची एंट्री झाल्याने चाहत्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळतेय.


शुगर कंट्रोल करण्यासाठी करा ‘या’ तीन प्रकारच्या चहांचे सेवन