Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन Old म्हणणाऱ्या तेलुगू प्रोड्युसरला सामंथाने दिले असे सडेतोड उत्तर

Old म्हणणाऱ्या तेलुगू प्रोड्युसरला सामंथाने दिले असे सडेतोड उत्तर

Subscribe

साउथ सिनेमातील अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आजकाल जोरदार चर्चेत असते. अशातच तेलुगू प्रोड्युसर चिट्टीबाबू यांनी सामंथाला ओल्ड असे म्हटले. यावर आता सामंथाने त्यांना त्याचे उत्तर दिले आहे. खरंतर सामंथाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने आपले शूटिंगचे शेड्युल, हॉस्पिटल ते घर, ट्रॅवल अशा विविध कामांचे फोटो शेअर केलेत. अभिनेत्रीने सुरुवातील तो फोटो शेअर केला आहे जेव्हा ती १६ वर्षाची होती.

सामंथा ही मायोसिटीस नावाच्या एका ऑटोइम्युशन कंडीशनचा सामना करत आहे. साममंथाने यासाठी हाइपरबेरिक थेरेपी बद्दलचा एक स्क्रिनशॉट ही शेअर केला. या व्यतिरिक्त अभिनेत्रीने रेगिस्तान मध्ये घोडेस्वारी करताना सुद्धआ फोटो शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

- Advertisement -

तेलुगु निर्माते चिट्टीबाबू यांनी पुन्हा सामंथावर टीका केली. तेव्हा तिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत नाव न घेता चिट्टीबाबू यांच्या कानातून निघालेल्या केसांची खिल्ली उडवली होती. सामंथाचे करियर संपणार अशा विधानाची सारवासारव करत चिट्टीबाबू यांनी आपल्या नव्या विधानात असे म्हटले होते की, सामंथा आता १८-२० वर्षाची नाही. त्यामुळेच मी म्हटले होते की, शांकुतलम सारख्या आइकॉनिक सिनेमात शांकुतलाची भुमिका साकारण्यासाठी ती परफेक्ट नव्हती. यामध्ये चुकीचे काय आहे? तिचे ग्लॅमरसचे दिवस संपले असून तिने आता यामधून बाहेर आले पाहिजे. आता तिने सपोर्टिंग रोल केला पाहिजे असे ही चिट्टीबाबू यांनी म्हटले.


- Advertisement -

हेही वाचा- दाक्षिणात्य अभिनेत्री Samantha चे जबरा फॅनने बनवलेय मंदिर

- Advertisment -