समंथा रूथ प्रभू सोशल मीडियापासून दूर? चाहते पडले चिंतेत

समंथाने गेल्या पंधरा दिवसांपासून फक्त तिच्या इंस्टाग्रामवरच नाही तर तिच्या इतर कुठल्याच सोशल मीडिया अकाऊंटवर कोणतीही नवीन अपडेट शेअर केलेली नाही.

टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभु सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वारंवार आपले नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातील गोष्टी सुद्धा तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. मात्र, मागील जवळपास पंधरा दिवसांपासून समंथा आपल्या सोशल मीडियापासून लांब गेली आहे. तिने कोणतीही नवीन अपडेट किंवा फोटो शेअर केलेला नाही. ३० जून पासून समंथाने कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलेली नाही. त्यामुळे आता समंथाच्या चाहत्यांनी तिची काळजी वाटू लागली आहे.

समंथाने गेल्या पंधरा दिवसांपासून फक्त तिच्या इंस्टाग्रामवरच नाही तर तिच्या इतर कुठल्याच सोशल मीडिया अकाऊंटवर कोणतीही नवीन अपडेट शेअर केलेली नाही. जेव्हा समंथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट झाला तेव्हा सुद्धा समंथा सोशल मीडियावर सक्रिय होती. मात्र, आता अचानक ती सोशल मीडियावर सक्रिय नसल्यामुळे चाहते चिंतेत पडले आहेत.

समंथाच्या चाहत्यांना वाटतेय काळजी

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

समंथाने शेवटची पोस्ट ३० जून रोजी शेअर केली होती. त्यानंतर तिने कोणतेही अपडेट शेअर केलेले नाहीत. त्यामुळे तिचे चाहते वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. तिच्या चाहत्यांच्या मते, समंथा कदाचित सोशल मीडियापासून लांब गेली आहे किंवा आपल्या चाहकत्यांसी संवाद साधण्याच्या मूडमध्ये नसेल. त्यांपैकी एका चाहत्याच्या मते, समंथा सध्या तिच्या मोठ्या प्रोजेक्टच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर सक्रिय नाही.


हेही वाचा :राखी सावंत गेली बूस्टर डोस घ्यायला; विचित्र अवतार पाहून युजर्सना हसू आवरेना