Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Samantha Ruth Prabhu ने डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट ; समांथा आणि नागा...

Samantha Ruth Prabhu ने डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट ; समांथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र येणार ?

Subscribe

टॉलीवूडमधील अभिनेत्री समांथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या रीलेशनशिपच्या सोशल मिडियावर सुरुच असतात. मात्र, काही महिन्यांपूर्वी समांथा आणि  नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. मात्र समांथाच्या एका कृत्यामुळे सर्व चाहते चकित झाले असून, या पोस्टमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरंतर, समंथाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरुन घटस्फोटाची पोस्ट हटवली आहे.

टॉलीवूडमधील अभिनेत्री समांथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या रीलेशनशिपच्या सोशल मिडियावर सुरुच असतात. मात्र, काही महिन्यांपूर्वी समांथा आणि  नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. मात्र समांथाच्या एका कृत्यामुळे सर्व चाहते चकित झाले असून, या पोस्टमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरंतर, समंथाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरुन घटस्फोटाची पोस्ट हटवली आहे. नागा चैतन्य आणि समांथाने 2 ऑक्टोबर 2021 ला इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली होती. मात्र ही घटस्फोटाची पोस्ट अभिनेत्रीने तिच्या टाइमलाइनमधून डिलीट केली आहे. मात्र नागा चैतन्यने ही पोस्ट डिलीट केलेली नाही. मात्र अजूनही हे स्पष्ट झालेलं नाही की, समांथाने ही पोस्ट डिलीट केली आहे की, ही पोस्ट आर्काइव केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chay Akkineni (@chayakkineni)

- Advertisement -

समांथाच्या प्रोफाईलवरून पोस्ट डिलीट केल्यानंतर हे दोघे पुन्हा एकत्र येत आहेत का असा अंदाज चाहते करत आहेत? दोघांमध्ये काही सलोखा आहे का? मात्र, यावर समांथा रुथ प्रभू किंवा नागा चैतन्य यांच्याकडून अजूनही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. समांथा आणि नागा यांनी ऑफिशियल पोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्ही संपूर्ण विचार करुनच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, आमची मैत्री फार जुनी आहे. ही आमच्यातील मैत्री आमच्या दोघांमध्ये बंध कायम ठेवण्यात मदत करेल.

अभिनेत्री समांथा अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटातील ‘ऊ अंतवा’ या गाण्यामुळे चर्चेत आली आहे. हे तिचं पहिल आयटम सॉंग असून, या गाण्यासाठी समांथाने ५ कोटी रुपये मानधन म्हणून घेतल्याचे म्हटले जाते.दरम्यान समांथाला आणखी अनेक प्रोजक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – मेडिकलवाल्यांना नोटा मोजायला वेळ कसा मिळतो?, अजितदादांनी कोरोना टेस्ट कीटवरुन फटकारलं


 

- Advertisment -