नागा चैतन्यला विसरण्यासाठी समंथा रूथ प्रभू करतेय दुसरं लग्न

समंथा लवकरच दुसरं लग्न करणार आहे. समंथा आपला भूतकाळ विसरून नव्या आयुष्याची सुरूवात करण्यासाठी दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे.

टॉलिवूड अभिनेत्री समंथा रूथ प्रभू सध्या वारंवार चर्चेत असते. समंथा कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मात्र समंथा मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर झाली आहे. यावरून तिच्या चाहत्यांकडून विविध अंदाज लावले जात होते. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, समंथा सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. याबाबत तिच्या टीमकडून खुलासा करण्यात केला आहे. त्यामुळे आता समंथाचे चाहते चिंतेत पडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

इतकचं नव्हे तर, समोर आलेल्या माहितीनुसार नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथा मानसिक तणावाखाली आहे. त्यामुळेच तिने स्वतःला लोकांपासून एकांतात ठेवणं पसंत केलं आहे. तसेच असं म्हटलं जातंय की, समंथा लवकरच दुसरं लग्न करणार आहे. समंथा आपला भूतकाळ विसरून नव्या आयुष्याची सुरूवात करण्यासाठी दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. असं म्हटलं जातंय की, समंथा रूथ प्रभूचे गुरू, सदगुरू जगदीश वासुदेव यांनी तिली दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी समंथाला भूतकाळ मागे टाकून आयुष्यात पुढे जाण्याचा देखील सल्ला दिला आहे. सध्या सदगुरू समंथाला वारंवार प्रेरणा देत आहेत.

इतकंच नव्हे तर, मिळालेल्या माहितीनुसार समंथाने तिचे विचार बदलायला सुरूवात केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी समंथा रूथ प्रभूने, नागा चैतन्यसोबतचे आपल्या लग्नाचे जुने फोटो शेअर करत घटस्फोट झाल्याचं दुःख व्यक्त केलं होतं. ज्यानंतर समंथा रूथ प्रभू खूप भावनिक परिस्थितीतून जात आहे.


हेही वाचा :

मी नकारात्मक गोष्टींवर… ‘ब्रह्मास्त्र’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला खोटं म्हणणाऱ्या कंगनाला मौनी रॉयने दिलं उत्तर