सिनेसृष्टी म्हटलं की, अफेअर्सच्या चर्चा होणं फार कॉमन आहे. कित्येक कलाकार आपली प्रेमप्रकरणं लपवून ठेवायचा प्रयत्न करतात तर काही कलाकार खुल्लम खुल्ला प्रेमाची कबुली देतात. अनेकदा हे कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होत असतात. कधी फॅमिलीसोबत तर कधी मित्र मैत्रिणींसोबत. पण कधीतरी कुणी एक अशी व्यक्ती असते जिच्यासोबत वारंवार स्पॉट झाल्यास त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू होतात. दरम्यान, असंच काहीसं अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत घडलंय. (Samantha Ruth Prabhu New Boyfriend learn about him)
गेल्या बऱ्याच काळापासून समंथा सिंगल लाईफचा आनंद घेतेय. नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने करिअरवर पूर्ण फोकस केले. पण आता तिच्या आयुष्यात परत एकदा प्रेमाचा बहर फुलताना दिसतोय. काही दिवसांपासून अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं बोललं जातंय. त्याच झालं असं की, गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये समंथा तिच्या रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत दिसली होती. अनेकदा एकत्र स्पॉट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचे नवे फोटो समोर आले आहेत. जे पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना जोर आला आहे.
आता समंथाच्या चाहत्यांना हा प्रश्न पडला असेल की, तो नेमका आहे तरी कोण? तर समंथासोबत दिसणारा तो म्हणजेच अभिनेत्रीचा मित्र राज निदिमोरु आहे. सध्या समंथा राजसोबत डेटिंग करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो त्यांच्या एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ब्रन्चचा आहे. या स्पेशल सेलिब्रेशनसाठी समंथाने हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. तर राजने कॅज्युअल लूक केला होता. सगळ्यांसोबत काढलेल्या या फोटोत पोज देताना राज समंथाच्या अगदी मागे उभा दिसतोय. नीट पाहिलं तर लक्षात येईल त्याने समंथाच्या खांद्यावर हात ठेवला आहे.
View this post on Instagram
सध्या समंथा आणि राज डेटिंग करत असल्याचं बोललं जातंय. राजबद्दल अधिक सांगायचं झालं तर, तो सिनेविश्वात दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. माहितीनुसार, त्याने ‘द फॅमिली मॅन’, ‘फर्जी’, ‘सिटाडेल: हनी बनी’ आणि ‘गन्स एंड गुलाब्स’ अशा अनेक सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. भारतात इंजीनियरींगचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने अमेरिकेतून उच्च शिक्षण घेतले आहे.
हेही पहा –
Shreya Bugade : अभिनेत्री ते उद्योजिका – कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे