Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन दाक्षिणात्य अभिनेत्री Samantha चे जबरा फॅनने बनवलेय मंदिर

दाक्षिणात्य अभिनेत्री Samantha चे जबरा फॅनने बनवलेय मंदिर

Subscribe

दाक्षिणात्या सिनेमातील प्रेक्षकांमध्ये आपल्या आवडीच्या अभिनेत्र्यांची मंदिर बनवण्याची परंपरा आहे. अशा प्रकारची काही प्रकरणे सुद्धा समोर आली होती. त्यामध्ये नयनतारा, हंसिका आणि नमिता सारख्या कलाकारांची तमिळनाडुत मंदिरे तयार केली गेली. सामंथा ही देशातील सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेत्र्यांपैकी एक असून तिचा चाहता वर्ग हा फार मोठा आहे. तर आता तिच्या नावे एक मंदिर उभारले जात आहे. हे मंदिर आंध्र प्रदेशातील बापटलाजवळी अलापडू गावात बनवले जातेय.

तिचा एक जबरा फॅन तेनाली संदीप द्वारे मंदीर बांधले गेले आहे. चाहत्याने मंदिराचे काम पूर्ण केले आहे. सामंथाचे मंदिर हे २८ एप्रिलला सुरु होणार आहे.

- Advertisement -

खरंतर सामंथाचा हा जबरा फॅन तिला कधीच समोरुन भेटलेला नाही. पण त्याने असे म्हटले आहे की, तिच्या सिनेमातील कामच नव्हे तर प्रत्युषा फाउंडेशनच्या माध्यमातून तिने केलेल्या डोनेशनच्या कामावरुन तिचा तो जबरा फॅन बनला आहे. सामंथाच्या या मंदिराबद्दल तिच्या पीआर टीमकडून काहीच माहिती समोर आलेली नाही. पण सामंथा यावर जरुर प्रतिक्रिया देईल असे जबरा फॅनला वाटत आहे.

- Advertisement -

सामंथाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिला शाकुंतलम मध्ये पाहिले गेले. या सिनेमाला संमीश्र प्रतिक्रिया दिल्या गेल्या. तसेच नुकतेच तिला Citadel च्या हिंदी भाषेतील सीरिजमध्ये ती वरुण धवन सोबत मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे.

 

- Advertisment -