Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नागा चैतन्यला अनफॉलो केल्यानंतर समंथाची पोस्ट, म्हणाली...

नागा चैतन्यला अनफॉलो केल्यानंतर समंथाची पोस्ट, म्हणाली…

Subscribe

दोघेही विभक्त झाल्यापासून काहीना काही कारणांमुळे दोघेही चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी समंथाने नागा चैतन्याच्या कुटुंबियांनी दिलेली लग्नाची साडी त्यांना परत केली होती. त्यानंतर आता समंथाने नागाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.

साऊथची प्रसिद्ध जोडी असलेल्या नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)  यांचा घटस्फोट झाला असला तरी त्यांच्या नात्याची चर्चा सतत होत असते. ऑक्टोबर २०२१मध्ये समंथा आणि नागा चैतन्य विभक्त झाले. दोघांच्या विभक्त होण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दोघेही विभक्त झाल्यापासून काहीना काही कारणांमुळे दोघेही चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी समंथाने नागा चैतन्याच्या कुटुंबियांनी दिलेली लग्नाची साडी त्यांना परत केली होती. त्यानंतर आता समंथाने नागाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.

 

- Advertisement -

नागा चैतन्यला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर समंथाने एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर तूफान चर्चा आहे. समंथाने पोस्टमध्ये म्हटलेय, “कधी कधी ताकद ही तुमच्या आतली इतकी मोठी आग नसते की ती प्रत्येक जण पाहू शकेल. पण कधी कधी छोटीशी ठिणगीही पुरेशी असते जी तुम्हाला सांगते, शांतपणे पुढे जा आणि तुम्हाला जे हवे ते मिळवा”. समंथाने नागा चैतन्यला अनफॉलो केले असले तरी नागाचा भाऊ अखिल अक्किनेनीला ती अजून फॉलो करतेय.

- Advertisement -

समंथाला नको नागा चैतन्यसोबतच्या आठवणी

समंथा आणि नागा चैतन्यने २०१७मध्ये लग्न केले. परंतु चार वर्षांतच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या विभक्त होण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. असे असले तरी दोघेही सध्या आपापल्या कामात व्यस्त आहेत. नागा चैतन्य “लाल सिंह चड्डा” या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तर समंथा “यशोदा” सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

काही दिवसांपूर्वी समंथाने त्यांच्या घटस्फोटाची पोस्ट सोशल मीडियावरुन डिलीट केली होती. त्यावेळेस समंथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या.  Samantha Ruth Prabhu ने डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट ; समांथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र येणार ?


हेही वाचा –  नागा चैतन्यशी घटस्फोट झाल्यानंतर समंथाने पुन्हा बदललं सोशल मीडियावरचं नाव!

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -