मोस्ट पॉप्युलर फीमेल स्टारमध्ये समंथा प्रथम क्रमांकावर; बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकलं मागे

सध्या टॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची चर्चा फक्त टॉलिवूडमध्येच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील आहे. समंथाला मोस्ट पॉप्युलर फीमेल स्टार म्हणून निडण्यात आलं आहे. भारतातील मोस्ट पॉप्युलर फीमेल स्टारर्सच्या लिस्टमध्ये समंथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. समंथाने या लिस्टमध्ये आलिया, दीपिका, कतरीनाला देखील मागे टाकलं आहे.

मोस्ट पॉप्युलर फीमेल स्टार मध्ये समंथा प्रथम क्रमांकावर

ओरमॅक्स स्टार्स इंडियाकडून जाहीर करण्यात आलेल्या या लिस्टमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या यादीत एकूण 10 अभिनेत्रींची नावं जाहिर केली आहेत. यामध्ये समंथा पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आलिया भट्ट आहे. तिसऱ्या क्रमांकावर नयनतारा आणि चौथ्या क्रमांकावर काजल अग्रवाल, पाचव्यावर दीपिका पादुकोण, सहाव्या क्रमांकावर रश्मिका मंदाना, सातव्यावर कतरीना कैफ, आठव्यावर अनुष्का शेट्टी, नवव्या क्रमांकावर कृति सुरेश आणि दहाव्या क्रमांकावर त्रिशा कृष्णन आहे. या ट्रेंडवरुन सहज दिसून येतय की बॉलिवूडप्रमाणे आता टॉलिवूड अभिनेत्री देखील भारतात लोकप्रिय होऊ लागल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

दरम्यान, समंथाला ‘द फॅमिली मॅन 2’ मुळे खूप लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिने एका खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने पुष्पा चित्रपटामधील एका गाण्यावर डान्स केला होता. या गाण्यामुळे समंथा अधिक लोकप्रिय झाली. तेव्हापासून समंथा वारंवार चर्चेत असते.

 

 


हेही वाचा :

आलियाच्या मुलीचं नाव तुम्हाला माहीत आहे का?, मग ही बातमी वाचा