‘चिटिंग करणाऱ्यांचे भले होत नाही’, सामंथाचा घटस्फोट होताच एक्स बॉयफ्रेंडने केलं ट्वीट

Samantha Siddharth
'चिटिंग करणाऱ्यांचे भले होत नाही', समंथाचा घटस्फोट होताच एक्स बॉयफ्रेंडने केलं ट्वीट

सामंथा आणि नागा चैतन्य यांनी २०१७ मध्ये धूमधडाक्याने लग्न केले होते. सामंथा आणि नागा या सुपरहिट जोडीच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये खूप निराशा झाली आहे. चाहत्यांना त्यांची जोडी रिअल आणि रील दोन्हीमध्ये खूप भावली. अशा स्थितीत या दोघांच्या वेगळेपणामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सामंथा आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या नात्यातून विभक्त होण्याची घोषणा केली आणि त्यानंतर अवघ्या काही तासात अभिनेता आणि सामंथाचा एक्स बॉयफ्रेंड याने एक ट्विट केले. नेटकऱ्यांनी या ट्विटला या दोघांच्या घटस्फोटाशी जोडले आहे.

असे केले सिद्धार्थने ट्विट

सिद्धार्थ आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला की, ‘मी शाळेत शिक्षकाकडून जी पहिली गोष्ट शिकलो होतो, ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला दगा देणाऱ्याची कधीही भरभराट होत नाही. तुम्ही काय शिकलात?’.

सामंथा आणि नागाच्या घटस्फोटानंतर चाहत्यांसह नेटकऱ्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली. पण अभिनेता सिद्धार्थने अप्रत्यक्षपणे सामंथावर निशाणा साधला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे सिद्धार्थने केलेले ट्वीट सध्या चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहे.

सामंथा आणि सिद्धार्थ हे दोघंही गेल्या काही वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. ते दोघेही एकमेकांना डेट करत होते. एका मुलाखतीत सामंथाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी विधान केले होते, ती म्हणाली होती की, अभिनेत्री सावित्री प्रमाणे माझे वैयक्तिक आयुष्य संकटात सापडले होते. मात्र नशीबाने मला लवकर त्याची जाणीव करून दिली आणि मी त्या नात्यातून वेळेत बाहेर पडली. यानंतर माझ्या आयुष्य़ात नागा चैतन्य आला. या वक्तव्यानंतर सिद्धार्थने सामंथावर निशाणा साधत हे ट्विट केले आहे.