टॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अलीकडे तिच्या नव्या चित्रपटांमुळे तसेच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काल (14 एप्रिल ) समंथाचा ‘शाकुंतलम’ चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी बऱ्यापैकी कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईची निर्मात्यांना मोठी अपेक्षा होती. मात्र तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आण हिंदी या पाच भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 5 कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, पाच भाषांमध्ये 5 कोटी कमावलेल्या चित्रपटातील 32 टक्के वाटा तेलुगू भाषेतील आहे. तर यूएस बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 125 डॉलर्सची कमाई केली आहे.हा चित्रपट महाकवी कालिदास यांच्या संस्कृत नाटक ‘अभिज्ञान शाकुंतलम’ वर आधारित असणार आहे. या चित्रपटात राजा दुष्यंत आणि शकुंतलेची प्रेम कथा दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन गुना शेखरने केलं असून हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 80 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. समंथा रुथ प्रभू व्यतरिक्त मल्याळम अभिनेता देव मोहन देखील मुख्य भूमिकेत आहे. या शिवाय यात अभिनेते सचिन खेडेकर, कबीर बेदी, डॉ.एम.मोहन बाबू प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, अदिती बालन हे कलाकार महत्वाची भूमिका साकारताना दिसतील.
या चित्रपटांमध्ये देखील दिसणार समंथा
या चित्रपटानंतर समंथा ‘फॅमिली मॅन 2’ मध्ये देखील दिसून येणार आहे. तसेच ती विक्की कौशलसोबत ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’मध्ये देखील दिसून येणार आहे.
हेही वाचा :