घरमनोरंजन'हे तर आठवं आश्चर्य' समंथाच्या नव्या चित्रपटावर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

‘हे तर आठवं आश्चर्य’ समंथाच्या नव्या चित्रपटावर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Subscribe

समंथाचा 'यशोदा'(yashoda) चित्रपट एकाच वेळी तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा(samantha) ही अनेक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘पुष्पा'(pushpa) चित्रपटातील गाण्याने समंथाच्या लोकप्रियतेत अधिकच वाढ झाली. अशातच आता समंथाने तिच्या पुढील चित्रपटाचा टीझर लाँच करण्याची घोषणा केली आहे. समंथाचा पुढील चित्रपट यशोदा आहे आणि त्याचा टीझर 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. हरी-हरीश ही दिग्दर्शक जोडी समंथाचा ‘यशोदा'(yashoda) चित्रपट बनवत आहे. यामध्ये प्रसिद्ध कलाकार वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा आणि संपत राज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या घोषणेपासून समंथाच्या चाहत्यांनाकडून मोट्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत.

हे ही वाचा – अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला समन्स; २६सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश

- Advertisement -

समंथाचा ‘यशोदा'(yashoda) चित्रपट एकाच वेळी तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘मी जगातील सात आश्चर्यांबद्दल ऐकले होते आणि आठवे पाहिले.’ एका चाहत्याने लिहिले आहे की, ती गर्दीतही वेगळ्या नजरेने दिसते. काही जण तिचा लूक आवडला असंही म्हणत आहेत तर काही जण तिला फॅब्युलस म्हणत आहेत. अशा प्रकारे, समंथाच्या लूकचे खूप कौतुक केले जात आहे.

हे ही वाचा – बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पाची आराससुद्धा खास, पाहा झलक

- Advertisement -

चित्रपटाचे निर्माते शिवलेंका कृष्णा प्रसाद म्हणाले, ‘समंथाने ‘फॅमिली मॅन 2’ वेब सीरिजद्वारे संपूर्ण भारतातील प्रेक्षकांना आकर्षित केले. त्यांचा आवाका लक्षात घेऊन आम्ही कोणतीही तडजोड न करता हा प्रकल्प उभा करत आहोत. समंथाचं काम पाहून मला तिचा अभिमान वाटतो. समंथाचा नवा चित्रपट पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक आहेत.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -