समंथाच्या ‘यशोदा’ चित्रपटाने 2 दिवसात केला 10 कोटींचा टप्पा पार

टॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अलीकडे तिच्या नव्या चित्रपटांमुळे तसेच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकताच समंथाचा यशोदा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनापूर्वीपासूनच समंथाचा हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला देखील मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये समंथाने एका 3 महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेची भूमिका साकारली आहे.

यशोदाने 2 दिवसात कमावले इतके कोटी
11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 6.32 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 4 कोटींची कमाई असून एकूण या चित्रपटाने 10 कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

5 भाषांमध्ये प्रदर्शित झाला ‘यशोदा’चा ट्रेलर

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

समंथा रुथ प्रभुचा आगामी ‘यशोदा’ चित्रपट 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी ‘यशोदा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानंतर ‘फॅमिली मॅन 2’ मध्ये देखील दिसून येणार आहे. तसेच ती विक्की कौशलसोबत ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’मध्ये देखील दिसून येणार आहे.

खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे समंथा
मागील काही महिन्यांपासून समंथा तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. तसेच सध्या ती एका आजारामुळे चर्चेत आहे. ती सध्या मायोसिटिस नावाच्या ऑटोइम्यून या आजाराने ग्रसीत आहे.

 


हेही वाचा :

‘ऊंचाई’ चित्रपटाने अवघ्या 2 दिवसात कमावले इतके कोटी