नुक्कड मालिकेतील अभिनेते समीर खक्कर यांचे निधन

हिंदी चित्रपट आणि हिंदी टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते समीर समीर खक्कर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना बोरीवलीच्या एम एम रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दूरदर्शनवरील प्रसिद्ध ‘नुक्कड’ मालिकेतून त्यांना खोपडी या व्यक्तिरेखेमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. 90 च्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी ‘पुष्पक’, ‘शहेनशाह’, ‘रखवाला’, ‘दिलवाले’, ‘राजा बाबू’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. 1996 मध्ये त्यांनी अचानक भारत सोडला आणि ते अमेरिकेत राहू लागले होते.

अमेरिकेतील नोकरीमुळे सोडला अभिनय

समीर अमेरिकेला गेल्यानंतर समीर यांनी अभिनयाव्यतिरिक्त जावा कोडर म्हणून नोकरी करू लागले. कारण तिथे त्यांना अभिनेता म्हणून कोणी ओळखत नसल्याने समीर यांना दुसऱ्या क्षेत्रात काम करावे लागले. 2008 मध्ये त्यांची नोकरी गेली अशीही एक माहिती समोर येत आहे.