समीर-शेफालीचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, सोशल मीडियावर चर्चा

समीर आणि शेफाली(sameer and shefali) यांच्या जोडीला सुद्धा प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. नुकतंच 'किचन कल्लाकार' च्या मंचावर समीर आणि शेफाली यांचं लग्न लावून दिलं. त्यावेळी समीर आणि शेफाली यांनी एकमेकांसाठी एक भन्नाट उखाणा सुद्धा घेतला.

माझी तुझी रेशीमगाठ(majhi tujhi reshimgath) ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. प्रेक्षकांनीही या मालिकेला चांगला प्रतिसाद दिला. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेत नायकाची भूमिका आभिनेता श्रेयस तळपदे(shreyas talpade) साकारतो आहे तर नायिकेची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहेरे(prarthana behere) साकारत आहे. यांच्या सोबतच संकर्षण कऱ्हाडे(sankarshan kahrade), प्रदीप वेलणकर यांना सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. तर या मालिकेत बालकलाकार मायरा हीने सुद्धा प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नुकतच यश आणि नेहा यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. यश आणि नेहा सोबतच या मालिकेतील समीर आणि शेफाली(sameer and shefali) यांच्या जोडीला सुद्धा प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. नुकतंच ‘किचन कल्लाकार’ च्या मंचावर समीर आणि शेफाली यांचं लग्न लावून दिलं. त्यावेळी समीर आणि शेफाली यांनी एकमेकांसाठी एक भन्नाट उखाणा सुद्धा घेतला.

आणखी वाचा – माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नवा ट्विस्ट, परीच्या खऱ्या बाबांची मालिकेत एन्ट्री

 

आणखी वाचा – नेहा कामतचा मालिकेत नवा लुक, व्हिडिओ पोस्ट करताच सोशल मीडियावर चर्चा

 

माझी तुझी रेशीमगाठ(majhi tujhi reshimgath) मालिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे समीर ही व्यक्तिरेखा साकारतो आहे तर अभिनेत्री काजल काटे ही शेफालीची भूमिका साकारते आहे. ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात अभिनेत्री काजल सुद्धा सहभागी झाली होती. त्यावेळी कार्यक्रमात अनेक गमती जमाती पाहायला मिळालया. त्यावेळी मंचावर उपस्थित असलेल्यांनी समीर आणि शेफालीचे लग्नही लावून दिले. त्यांनतर समीरला शेफालीसाठी(sameer and shefali) खास उखाणा सुद्धा घ्यायला संगितले. याचा एक मजेशीर व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या इंस्टाग्राम पेज वरून शेअर केला आहे.

आणखी वाचा – वारीत सहभागी होऊन अभिनेत्री करतेय वारकऱ्यांची सेवा, सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

आणखी वाचा – चित्रपटांमध्ये कमबॅक करत नीतू कपूर ओटीटी वरही झळकणार

 

यावेळी उखाणा घेताना संकर्षण म्हणजेच समीर म्हणाला, ”तुमच्या सगळ्यांच्या उत्साहाने माझी ही काय अवस्था झाली, मला वाटलं मिळेल एखादी नेहासारखी पण मिळाली शेफाली”. समीरचा हा उखाणा ऐकून शेफालीने समीर(sameer and shefali) साठी एक मजेशीर उखाणा घेतला शेफाली म्हणाली. ”मोगऱ्याचं फुल हलत कसं डुलु डुलु, समीरराव आमचे डुकराचं पिल्लू” असा उखाणा शेफालीने घेतला. या नंतर त्या दोघांनी एका रोमँटिक गाण्यावर डान्स सुद्धा केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Doctors Day : आरजे, मॉडेल, शिक्षिका डॉ. गीता प्रकाश यांचा अनोखा प्रवास

 

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूप हिट ठरली आहे या मालिकेतील यश नेहाचा(yash and neha)रोमान्स असुदे, शेफाली आणि समीरचा(sameer and shefali) खोडकर आणि खेळकर पण असुदे किंवा यश आणि समीर मधली मैत्री असूदेत या सगळ्यांमुळेच ही मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात. यातील सर्वच व्यक्तीरेखा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत.