घरमनोरंजनसम्राट पृथ्वीराज बॉक्स ऑफिसवर आपटला, प्रेक्षक नसल्याने अनेक शोज रद्द

सम्राट पृथ्वीराज बॉक्स ऑफिसवर आपटला, प्रेक्षक नसल्याने अनेक शोज रद्द

Subscribe

चित्रपट आपटल्याने सध्या या चित्रपटाचे शोज कमी करण्यात आले आहेत. तर, प्रेक्षकच नसल्याने अनेक ठिकाणी शोज रद्द करण्यात येत आहेत.

अक्षय कुमारचा वॉर ड्रामा चित्रपट सम्राट पृथ्वीराजने (Samrat Prithviraj) बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला आहे. समिक्षकांपासून ते प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांनीच या चित्रपटाबाबत निगेटीव्ह रिव्ह्युज दिले. त्यामुळे चित्रपट आपटल्याने सध्या या चित्रपटाचे शोज कमी करण्यात आले आहेत. तर, प्रेक्षकच नसल्याने अनेक ठिकाणी शोज रद्द करण्यात येत आहेत. (Samrat Prithviraj failed in the box office, many shows cancelled due to lack of audience)

हेही वाचा – कॉमेडी क्वीन भारतीने मुलाचं नाव काय ठेवलं? दोन महिन्यांनी केला खुलासा

- Advertisement -

चित्रपटाच्या पहिल्याच दिवसांपासून प्रेक्षक संख्या कमी होती. त्यामुळे पहिल्याच दिवसांपासून कमाई फारशी चांगली झाली नाही. ११ जून रोजी या चित्रपटाची कमाई निराशा केली. रिपोर्ट्सनुसार, शनिवारी विकेंडच्या दिवशी २.३० कोटी कमाई झाली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने फक्त ५९.०१ कोटी रुपये कमावले आहेत.

हेही वाचा ‘पुष्पराज’ अडचणीत, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीत काम केल्याने FIR दाखल

- Advertisement -

सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनापूर्वी केलेल्या जाहिरातबाजीवरून हा चित्रपट तुफान गाजेल असं सगळ्यांना वाटलं होतं. मात्र, चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केल्याने चित्रपटाने फारशी कमाई केली नाही.

हेही वाचा – आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये सारा अली खान मुख्य भूमिकेत?

तज्ज्ञांच्या मते अक्षयच्या चित्रपटांची अशी अवस्था असेल तर येत्या काळात सिनेमागृहात चित्रपट चालतील की नाही याबाबत साशंकता आहे.

अक्षय कुमारचे लागोपाठ दोन चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. गेल्या महिन्यात आलेला बच्चन पांडे हा चित्रपटही तिकिटबारीवर आपटला. त्यानंतर आता लगेच दुसरा चित्रपट फ्लॉप ठरल्याने अक्षय कुमारच्या चाहत्यांना शॉक बसला आहे.

दरम्यान, या चित्रपटात ब्युटी क्विन मानुषी छिल्लरही महत्त्वाच्या भूमिकेत होती. तिचा हा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे या चित्रपटाकडून लोकांच्या फार अपेक्षा होत्या.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -