Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'हिजाब'मूळे सना खान ट्रोलिंगचा शिकार, ट्रोलेर्सच्या कमेंट्सने हैराण

‘हिजाब’मूळे सना खान ट्रोलिंगचा शिकार, ट्रोलेर्सच्या कमेंट्सने हैराण

लग्नानंतर सनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. सनाने भलेही अॅक्टिंगला राम राम केला असला तरी,सोशल मीडियावर आपल्या अनेक पोस्टमुळे सना नेहमीच चर्चेत असते.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची एकेकाळची अभिनेत्री सना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपुर्वीच तिने बॉलिवूडला अलबिदा करत इस्लाम धर्मासाठी आपले आयुष्य वेचणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता तिने मुफ्ती अनससोबत लग्न केले आहे. लग्नानंतर सनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. सनाने भलेही अॅक्टिंगला राम राम केला असला तरी,सोशल मीडियावर आपल्या अनेक पोस्टमुळे सना नेहमीच चर्चेत असते. नुकतच सनाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे नेटकर्‍यांच्या ट्रोलिंगचा शिकार होत आहे. पण सनाने देखील ट्रोलर्सला चांगलेच फटकारले आहे.सनाने तिच्या इंस्टाअकाऊंट वर हिजाब परिधान करून एक फोटो पोस्ट केला आहे. आणि यावरून अनेक युजर्सने प्रश्न उपस्थित केले आहे. युजरने कमेंट करत लिहले आहे की,” एवढं शिक्षण घेऊन कष्ट करून काय उपयोग झालं. तेच सर्वांसारखे पडद्याच्या मागे राहत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21)

- Advertisement -

युजरच्या कमेंटला उत्तर देत सना म्हणाली,” माझा भाऊ, जेव्हा मी पडद्यामागे राहून माझा व्यवसाय करू शकते, माझ्या जवळ उत्तम सासर आहे,नवरा आहे मला आणखी काय हवयं. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अल्लाह माझी रक्षा करत आहे. अल्हामदुल्लाह. मी माझे शिक्षण पूर्ण केलं आहे. तर हा विजयच आहे की नाही?” सनाने दिलेल्या उत्तरावर अनेकांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहे.

- Advertisement -

सनाने २० नोव्हेंबर रोजी लग्न केले असल्याचे सांगितले जात आहे. लग्नानंतर तिने आपले नाव बदलून सयैद सना खान केले आहे. तिच्या पतीचे नाव मुफ्ती अनस सयैद असून ते एक मौलाना आहेत. गुजरातमधील सूरत येथे ते राहत असल्याची माहिती मिळत आहे. अनस सयैद सोबत सना खानची ओळख झाली कशी? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या बातमीनुसार, बिग बॉस फेम एजाज खान याने सना खानची ओळख अनस सयैदसोबत करुन दिली होती.


हेहि वाचा – बिगबॉस फेम प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

- Advertisement -