Vidyut Jamwal : विद्युत जामवलचा ‘सनक’ ओटीटीवर होणार रिलीज

sanak vidyut jamwal is coming with the fantastic action thriller film
विद्युत जामवलचा 'सनक' ओटीटीवर रिलीज

जगभरात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. ओटीटी  नवं माध्यमाला आता वेबसीरिज प्रमाणे चित्रपट प्रदर्शनासाठी देखील पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड निर्मात्यांनी ओटीटीवर आपले चित्रपट प्रदर्शित केले. यात सर्वाच चित्रपटांना ओटीटीवर प्रतिसाद मिळत नाही. अशा परिस्थितीत आता बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल याचा आगामी ‘सनक: होप अंडर सीज’ हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.

विद्युत जामवालचा ‘सनक: होप अंडर सीज’ हा १४ महिन्यातील चौथा चित्रपट आहे. जो ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कनिष्क वर्माने केले आहे. यात विद्युत जामवालसह बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्री मुख्य भूमिका साकारत आहे.

नुकतच या चित्रपटाचं नवं पोस्टर लाँच झाले आहे. यात विद्युत जामवाल एक बंदूक घेऊव मिशनसाठी सज्ज असलेला दिसतोय. मात्र या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नाही. मात्र चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


कियारा आणि सिद्धार्थ लवकरचं चढणार बोहल्यावर?