Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन वाद्यवृंद संघाची संगीत रजनी

वाद्यवृंद संघाची संगीत रजनी

Subscribe

वाद्यवृंद म्हटले की त्यात लोककला, शाहिरी, लावणी, गायक, वादक या सगळ्या गोष्टी आल्याच, पण प्रेक्षकांच्या गरजेप्रमाणे कार्यक्रमाच्या कक्षाही रुंदावल्या गेलेल्या आहेत. माध्यमएक असले तरी यातल्या प्रत्येक विभागाला संघटनात्मक काम करण्याची गरज वाटायला लागलेली आहे. नाटक, चित्रपट, शाहीर, लावणी कलावंत यांच्यासोबत मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघानेही संघटनात्मक काम करणे सुरू केलेले आहे. कलाकारांच्या हिताबरोबर त्यांच्या अडचणीत खंबीरपणे उभे राहणे या त्यांच्या निर्णयामुळे निमित्त घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करणे वाढलेले आहे. यातून उपलब्ध होणारा निधी सभासद कलाकारांच्या हितासाठी वापरला जातो. त्यानिमित्ताने योगदान देणार्‍या कलाकारांचा सन्मान हाही या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पाचवा वर्धापन दिन त्यानिमित्ताने संगीत रजनी असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. २५ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता दामोदर हॉलमध्ये वाद्यवृंद संघाची संगीत रजनी पार पडणार आहे.

सुरेश औंधकर (ड्रेसवाले), केदार शिंदे, विजय पाध्ये यांना प्रामुख्याने कलागौरव पुरस्कार दिला जाणार आहे. जीवन गौरव पुरस्कारासाठी माया जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे. यानिमित्ताने आनंद मेस्त्री, कश्यप तांबे, अजय कातकर, अनिल करंजावकर, संतोष भामरे, संचिता मोरजकर, त्यागराज खाडीलकर, राहुल कुमार, अमिर हडकर, मंदार खराडे, शाहीर मानकर, विजय पाध्ये, नंदकुमार खोत या कलाकार तंत्रज्ञांचाही गौरव करण्यात येणार आहे. कलानिधीचे १२५ वाद्यवृंद या संगीत रजनीत सहभागी होणार आहेत, पण प्रेक्षक आकर्षित व्हावेत असा प्रयत्न या संगीत रजनीत होणार आहे. वलयांकित गायक त्यागराज खाडीलकर, अभिजित कोसंबी, मधुरा कुंभार हे प्रत्यक्ष एकापेक्षा एक सरस गाणी येथे सादर करणार आहेत. त्याहीपलीकडे खास आकर्षण म्हणजे अभिनेत्री आणि लोककलेची चाहती मेघा घाडगे दिलखेचक लावणी इथे सादर करणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -