घरमनोरंजनसंजूबाबाला होतोय 'त्या' चुकीचा पश्चाताप !

संजूबाबाला होतोय ‘त्या’ चुकीचा पश्चाताप !

Subscribe

१९९३ च्या बॉम्बस्फोटावेळी एके-५६ जवळ बाळगल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे, अभिनेता संजय दत्तने नुकतेच कबुल केले आहे.

बॉलीवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती ‘संजू’ सिनेमाची. संजू चित्रपटाने बॉक्सऑफिसफर दमदार कमाई केली असून हा चित्रपट लवकरच ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, अशी चिन्ह आहेत. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात, रणबीर कपूरने खुद्द संजूबाबाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे संजय दत्त आणि रणबीर कपूर या दोघांच्या चाहत्यांची चित्रपटाला भरभरुन पसंती मिळते आहे. संजू चित्रपटातून संजय दत्तच्या खासगी तसंच व्यावसायिक जीवनप्रवासाचा आढावा घेण्यात आला आहे. संजय दत्तच्या ड्रग्ज अॅडिक्शनपासून ते १९९३ च्या बॉम्बस्फोटाशी त्याचं जोडण्यात आलेलं नाव या सगळ्या मुद्द्यांवर चित्रपटामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. संजय दत्तवर आजपर्यंत अनेक प्रकारचे आरोप लावण्यात आले आहेत. अनेक गाजलेल्या प्रकरणांशी त्याचं नाव जोडण्यात आलं आहे. आजही हा सिलसिला कायम आहे. याच पार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका मुलाखतीत संजय दत्तने आपल्या चुका मान्य करत, या चुकांचा पश्चात्ताप होत असल्याचे बोलून दाखवले आहे.

एके-५६ बाळगल्याचा होतो पश्चात्ताप

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या या मुलाखतीदरम्यान संजूबाबने, मी स्वत:जवळ एके-५६ बंदूक  बाळगल्याचा आज मला पश्चात्ताप होत असल्याचे म्हटले आहे. ‘१९९३ च्या बॉम्बस्फोटावेळी आपण एके-५६ बाळगणं खूप मोठी चूक होती. या गोष्टीची मला खूप खंत वाटते. या चुकीचा मला आज खूप पश्चात्ताप होत आहे’, अशी कबुली संजय दत्तने दिली. संजू चित्रपटात या घटनेचा उल्लेख करण्यात आला असून, चित्रपट रिलीज झाल्यानंतर संजय दत्तने याप्रकरणी पश्चात्ताप होत असल्याची कबुली दिली आहे. तसंच मी या चुकीची पुरेपुर शिक्षाही भोगली असल्याचं संजूने म्हटलं आहे.

वाचा : ‘कॉलेजमध्ये होतो ड्रग अॅडिक्ट’- रणबीरचा खुलासा
याविषयीच्या आपल्या भावना शेअर करतेवेळी संजय दत्त म्हणाला, ‘या एका चुकीमुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्यावेळी जगभरातील माध्यमांमध्ये माझंच नाव आणि फोटो झळकत होता. त्याकाळात माझी प्रतिमा पूर्णत: मलिन झाली होती. मी आतकंवादी असल्याचा आरोपही माझ्यावर लावण्यात आला. त्याकाळात मी जे काही भोगलं आहे, तशी वेळ कधीच कुणावर येऊ नये. मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो की आयुष्यात काहीही करा पण माझ्यासारखे कधीच बनू नका.’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -