Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Video : लग्नाच्या वाढदिवशी Sanjay Duttने केला पत्नी मान्यताचा फूट मसाज,...

Video : लग्नाच्या वाढदिवशी Sanjay Duttने केला पत्नी मान्यताचा फूट मसाज, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

मान्यता ही संजय दत्तची तिसरी बायको आहे. २००८मध्ये दोघांनी लग्न केले. मान्यताशी लग्न करणे हा संजयच्या आयुष्यातील सर्वांत मोठा निर्णय होता.

Sanjay Dutt Marriage Anniversary : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि त्यांची पत्नी मान्यता दत्त यांच्या लग्नाला १४ वर्ष पूर्ण झाले. लग्नाच्या वाढदिवशी संजय मान्यताला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. संजय दत्त मात्र लग्नाचा वाढदिवस भन्नाट पद्धतीने साजरा करताना दिसला. संजय दत्तचा एक व्हिडीओ मान्यताने शेअर केला आहे. ज्यात संजय दत्त चक्क पत्नी मान्यताचे पाय दाबताना दिसत आहे. मान्यताने हा व्हिडीओ शेअर करत संजयसाठी एक प्रेमळ कॅप्शनही लिहीले आहे.

मान्यताने म्हटले आहे की, तुझ्यासोबत जितके दिवस घालवले ते दिवस बेस्ट होते. तु जो आहेस मी त्याच्यावरच प्रेम करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, हॅशटॅग १४,असे कॅप्शन मान्यताने शेअर केले आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या फार मजेदार कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maanayata Dutt (@maanayata)

- Advertisement -

अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत, ‘लगे रहो मुन्ना भाई !’ असे म्हटले आहे. तर एका युझरने म्हटले, ‘शेवटी १४ वर्षांनी मुन्ना भाई बायकोचा गुलाम झाला’. तर अनेकांनी संजय आणि मान्यताला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

मान्यता ही संजय दत्तची तिसरी बायको आहे. २००८मध्ये दोघांनी लग्न केले. मान्यताशी लग्न करणे हा संजयच्या आयुष्यातील सर्वांत मोठा निर्णय होता. दोघांच्या लग्नानंतर मान्यताचे कुटुंब तिच्यावर फार नाराज होते. संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा असून ऋचा आणि संजयला त्रिशला नावाची एक मुलगी आहे. तर मान्यता आणि संजूला ११ वर्षांची दोन जुळी मुले आहेत. मान्यताचे खरे नाव हे सारा असून तिचा जन्म दुबईतील मुस्लिम परिवारातील आहे.

संजय एकीकडे लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे तर दुसरीकडे त्याने त्याच्या शमशेर सिनेमाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. शमशेर हा सिनेमा २२ जुलै २०२२ ला रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संजय दत्तचे आयुष्य म्हणजे एक खुली किताब आहे असे म्हटले जाते. गर्लफ्रेंड, लग्न, कारावास या सगळ्याचे किस्से सर्वांना माहिती आहेत आणि आजही त्याची चर्चा कायम आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित संजू या सिनेमातून त्याचा प्रवास दाखवण्यात आला होता.


हेही वाचा – रणवीरने दिला दीपिकाच्या Gehraiyaanचा रिव्ह्यू, म्हणाला मी हे …

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -