घरताज्या घडामोडीसंजय दत्तला स्टेज ४ चा कॅन्सर; रुग्णालयाने दिली माहिती

संजय दत्तला स्टेज ४ चा कॅन्सर; रुग्णालयाने दिली माहिती

Subscribe

संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग स्टेज ३ चा नसून चौथ्या टप्प्यातला असल्याचे समोर आले आहे.

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला गेल्या आठवड्यात श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोरोनाच्या चाचणीसाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु, त्याचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या इतर चाचण्या करण्यात आले. त्यामध्ये त्याला फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, संजय दत्तने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत तो उपचारांसाठी कामांमधून ब्रेक घेत असल्याचे सांगितले. सुरुवातीला त्याला स्टेज ३ चा कर्करोग झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता रुग्णालयाने दिलेल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्तचा फुफ्फुसाचा कर्करोग स्टेज ३ चा नसून चौथ्या टप्प्यातला असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

ऑक्सिजनची पातळी झाली कमी

८ ऑग्सट रोजी संजय दत्तला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी घरात असणाऱ्या ऑक्सीमीटरवर आपल्या ऑक्सिजनची लेवल तपासली असता ती कमी दिसून आली. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याच्या उजव्या फुफ्फुसातून श्वास येत नसल्याचे दिसून आले. तसेच सीटी स्कॅन केले असता कळले ती त्याच्या उजव्या फुफ्फुसात काही द्रव जमा झाले आहे आणि दोन्ही फुफ्फुसात जखमाही झाल्या आहेत.

असे आले समोर

संजयला सुरुवातीला सांगण्यात आले की, त्याला इन्फेक्शन झाले असू शकते किंवा टीबी असू शकतो. तसेच जास्त व्यायाम केल्यामुळे जखमा देखील होऊ शकतात किंवा कर्करोग असू शकतो. त्यानंतर त्याच्या फुफ्फुसातले पाणी काढण्यात आले. जवळपास दीड लीटर पाणी काढण्यात आले. त्यानंतर ते तपासले असता त्याला कॅन्सर असल्याचे निदान झाले.

- Advertisement -

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आलेल्या रिपोर्टमध्ये हे निश्चित झाले आहे की, संजय दत्तला तिसऱ्या नाहीतर चौथ्या टप्प्यातला फुफ्फुसाचा कर्करोग आहे. यानंतर बुधवारीच मान्यता दत्तने स्टेटमेन्ट शेअर करत म्हटलं की, संजू लढाऊ आहे. तो लवकर बरा होईल आणि या काळात पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.


हेही वाचा – ‘या’ सेलिब्रिटीजनी मिळवला कॅन्सरवर विजय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -