बॉलिवूड अभिनेता संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. आगामी काळात त्याचा सुपरहिट सिनेमा ‘वास्तव’चा सिक्वल येऊ घातला आहे. या वर्षाच्या शेवटी ‘वास्तव 2’चे शूटिंग सुरु होईल आणि पुढच्या वर्षी रिलीजचा विचार केला जात आहे. त्यामुळे संजू बाबाचे चाहते एकदम खुश आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो सोफ्यावर बसून भूमिपूजनाचा विधी करताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ज्यामुळे संजय दत्तला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. (Sanjay Dutt trolled for doing pooja rituals while sitting on sofa)
संजय दत्त झाला ट्रोलिंगचा शिकार
सोशल मीडियावर अभिनेता संजय दत्तचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अभिनेता सोफ्यावर बसून धार्मिक विधी करताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता संजय दत्त कल्याण येथे एका नव्या प्रोजेक्टच्या भूमिपूजनासाठी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिला होता. व्हायरल व्हिडीओ याच सोहळ्यातील आहे. संजय दत्त धार्मिक भावना राखणारा अभिनेता असून त्याच्याकडून अशी चूक होणे नेटकऱ्यांना मान्य नाही. ज्यामुळे अभिनेत्याला ट्रोल केले जात आहे.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकतो की, अभिनेता संजय दत्त सोफ्यावर बसून भूमिपूजनाच्या विधीत सामील झाला आहे. मुख्य म्हणजे, त्याने सोफ्यावर बसूनचं धार्मिक विधी पूर्ण केल्या आहेत. जे पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर आपला संताप व्यक्त करताना लिहिलंय, ‘जमिनीवर बसायला काय त्रास होता? गॉगल लावून पुजा करणारा पहिला तूच असशील’. तर आणखी एकाने लिहिले, ‘देवाला ऍटिट्यूड दाखवतो आहेस का?’ तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘देवाला हलक्यात घेऊ नको बाबा.. एकदिवस थेट खाली आपटला जाशील’.
‘वास्तव 2’ची जोरदार तयारी
संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, त्याची कारकीर्द 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वास्तव’च्या माध्यमातून फुलली. या सिनेमाने त्याला एक अनोखं पात्र दिलं आणि वास्तवचा रघु दादा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. याच सिनेमाचा आता सिक्वल येण्याची जबरदस्त तयारी सुरु झाली आहे. माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगची सुरुवात करणार आहेत. यासाठी महेश मांजरेकर पूर्ण ताकदीनिशी तयारी करत आहे. मोठ्या काळानंतर ही दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवताना दिसणार आहे. आतापर्यंत ‘कुरुक्षेत्र’, ‘पिता’, ‘हथियार’ आणि ‘विरुद्ध’ या सिनेमांसाठी त्यांनी एकत्र काम केले आहे.
हेही पहा –
Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाचं ट्रोलर्सला प्रत्युत्तर, नेटिझन्सने पुन्हा केली टिंगल