घरमनोरंजन'हाऊसफुल ४' मध्ये दिसणार संजय दत्त?

‘हाऊसफुल ४’ मध्ये दिसणार संजय दत्त?

Subscribe

गेले बरेच महिने ‘हाऊसफुल ४’ ची चर्चा आहे. हाऊसफुल चित्रपटाच्या सगळ्याच सिरीज प्रेक्षकांना आवडल्या. लवकरच पुनर्जन्मावर आधारित कथेवर हाऊसफुल ४ या चित्रपटाचं चित्रिकरण सुरु होणार असल्याची बातमी आहे. यामध्ये संजय दत्त भूमिका करणार अशी बरीच चर्चा होती. मात्र संजय ही भूमिका करणार की नाही? हे अजूनही गुलदस्त्याच ठेवण्यात आलं आहे.

संजय दत्तला घेण्यास निर्माता उत्सुक

दुसऱ्या बाजूला चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियादवाला हे संजय दत्तला या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक असून योजना आखत असल्याची माहिती आहे. सध्या संजय दत्तच्या ‘कलंक’ चित्रपटाचादेखील साजिद सह-निर्माता आहे. सुत्रांनुसार, संजय दत्त एका वेगळ्या ‘हाऊसफुल ४’ मधून कॉमिक अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. शिवाय हा चित्रपट २ डी, ३ डी आणि आयमॅक्स ३ डी स्वरुपात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

साजिद खानच करणार दिग्दर्शन

पूजा हेगडे आणि क्रिती सॅनन या सिरीजमध्ये जोडली जाण्याची शक्यता असल्याचेदेखील सुत्रांनी सांगितलं आहे. तर ‘हाऊसफुल १’ आणि ‘हाऊसफुल २’ चा दिग्दर्शक साजिद खानच हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. पुढील वर्षी दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

संजय दत्तचे लवकरच प्रदर्शित होणारे चित्रपट

दरम्यान संजय दत्तचे सध्या बरेच चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. साहेब, बीवी और गँगस्टर ३ आणि तोर्बाज हे तिन्ही चित्रपट लवकर प्रदर्शित होतील. शिवाय सध्या संजय दत्त ‘कलंक’च्या चित्रिकरणात व्यस्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -