घरमनोरंजनसंजयदादा ठरले; सईसाठी ‘लकी’चार्म

संजयदादा ठरले; सईसाठी ‘लकी’चार्म

Subscribe

कुस्तीच्या लढतीमध्ये सई ताम्हणकरची टीम कोल्हापूरचे मावळे ही विजयी ठरल्यानंतर या मॅचला उपस्थिती लावलेल्या संजय जाधव यांना सईने लकी चार्म असल्याचे म्हटले आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि फिल्ममेकर संजय जाधव एकत्र आले की सुपहिट चित्रपट पाहायला मिळणार, हे समीकरणच झालं आहे. फिल्ममेकर-हिरोईनची ही जोडी सिनेमाक्षेत्रातच नाही तर खेळाच्या मैदानावरही हिट ठरली आहे. हे सध्या सुरू असलेल्या कुस्ती दंगलमध्ये पून्हा एकदा पाहायला मिळाले. सोमवार, १२ नोव्हेंबक रोजी संजय जाधव यांच्यासह सई ताम्हणकरची संपूर्ण टीम बालेवाडीमध्ये कोल्हापूर मावळे विरूध्द वीर मराठवाडा मॅचसाठी उपस्थित होती. आणि सईच्या कोल्हापूर मावळे टीमला ४-२ अशा गुणांसह घवघवीत यश मिळाले.

संजयदादाला सगळ्या मॅचसाठी यावं लागेल 

गेल्या काही दिवसांमधील मॅचेसमध्ये सोमवारी झालेली कोल्हापूर मावळेची लढत सर्वाधिक चुरशीची ठरली. टीम जिंकताच सईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आपली टीम ‘कोल्हापूर मावळे’ सोबत आनंद साजरा केल्यावर उत्साहात असलेली सई ताम्हणकर म्हणाली, “आजपर्यंत कुस्ती दंगलमध्ये झालेल्या सर्व लढतींपैकी आजची लढत ही सर्वाधिक चुरशीची आणि मनोरंजक लढत होती. शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या टीमच्या कुस्तीवीरांनी समोरच्या खेळाडूला मात देऊन यश मिळवलं. संजयदादा पहिल्यांदाच मॅच पाहायला आला आणि आम्ही मॅच जिंकलो. मी नेहमी म्हणते, दादा माझा लकीचार्म आहे आणि ते पुन्हा एकदा सिध्द झालं.” सई मिश्किलपणे संजय जाधव यांच्याकडे पाहत म्हणाली, “आता मला जिंकवायला संजयदादाला प्रत्येक मॅचसाठी यावंच लागणार. ”

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -