घरमनोरंजन'हीरामंडी' वेब सीरिजसाठी संजय लीला भन्साळींनी घेतलं कोट्यवधींचं मानधन

‘हीरामंडी’ वेब सीरिजसाठी संजय लीला भन्साळींनी घेतलं कोट्यवधींचं मानधन

Subscribe

‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्यानंतर आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी  यांचे देखील भाव वधारले आहेत. गंगूबाई काठियावाडी नंतर आता भन्साळी यांनी ‘हीरामंडी’ या वेब सीरिजची घोषणा केलीये. सध्या हीरामंडी वेब सीरिज बजेट, स्टार कास्ट आणि वेब सीरिजमध्ये कलाकारांनी घेतलेल्या मानधनामुळे चर्चेत आली आहे.  गेल्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्म  नेटफ्लिक्सने याची घोषणा केली होती. वेब सीरिजच्या दिग्दर्शनासाठी संजय लीला भन्साळी यांनी कोट्यवधी रुपयांचे मानधन आकारले आहे.

हीरामंडी तयार करण्यासाठी नेटफ्लिक्स तब्बल 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. सिरीजमध्ये अनेक मोठ्या दिग्गज कलाकारांची वर्णी लागली आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, वेब  सीरिजच्या कास्टींग ,प्रोडक्शन आणि कलाकारांसाठी 200 कोटी खर्च होणार आहे. यासह 60 ते 65 कोटी रुपये भन्साळी यांनी वेब सीरिजच्या दिग्दर्शनासाठी रक्कम आकारली आहे.

- Advertisement -

 

हीरामंडीमध्ये ‘या’ कलाकारांची वर्णी

वेब सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, हुमा कुरैशी, रिचा चड्ढा झळकणार आहे. दरम्यान अजूनही अनेक स्टार काम करणार असून सध्या त्यांची नावे गुलदसत्यात आहेत. माहितीनुसार माधुरी दिक्षित वेब सीरिजमध्ये मुख्य अभिनय करताना दिसणार आहे. यासह हीरामंडीमध्ये काम करण्यासाठी मुमताज यांना देखील अप्रोच करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी ही ऑफर नाकारली. मात्र याबद्दल अधिकृतपणे भाष्य करण्यात आलं नाहीये.

- Advertisement -

हीरामंडी हा संजय लीला भन्साळी यांचा अत्याधिक जवळचा प्रोजेक्ट असून ही वेब सीरिज एकूण सात भागात चित्रित करण्यात येणार आहे. सीरिजमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची कथा दाखवण्यात येणार आहे. तसेच हीरामंडी मध्ये राहणाऱ्या सेक्स वर्करची कथा मांडण्यात येणार आहे.

 


हे ही वाचा –  ‘JGM’ चित्रपटातून पहिल्यांदाच vijay deverakonda आणि pooja hegde दिसणार एकत्र

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -