Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'संजीवनी: अ शॉट ऑफ लाइफ' सोनू सूदची लसीकरण मोहिम

‘संजीवनी: अ शॉट ऑफ लाइफ’ सोनू सूदची लसीकरण मोहिम

या मोहिमेच्या माध्यमातून सोनू लोकांना प्रेरित करणे आणि त्यांच्यमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम करणार आहे.

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहे. यात अनेक बॉलिवूड कलाकारांनी कोरोना लसीचा डोस घेतला आहे. तसेच त्याच्या सोशल मीडिद्वारे पोस्ट शेअर करत यासंबंधी माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. यातच आता अभिनेता सोनू सूद यानेही कोरोन लसीचा डोस घेतला आहे. पंजाबमधील अमृतसर येथे कोरोना प्रतिबंधक लस त्याने घेतली आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवातही केली आहे या मोहिमेला त्याने संजीवनी: अ शॉट ऑफ लाइफ असे नाव दिले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सोनू लोकांना प्रेरित करणे आणि त्यांच्यमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम करणार आहे.

 यासंदर्भात माहिती देणारी एक पोस्ट शेअर करत तो म्हणाला आहे की, लोक अजूनही विचार करत आहेत लस घ्यायल हवी की नको. त्यामुळे या विषयावर जनागृती करणं महत्त्वाचे आहे. म्हणून मला ही मोहिम सुरु करावीशी वाटली. प्रत्येकाने आपल्या परिवारातल्या सदस्यांना, जे कोणी लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांना लस घेण्यासाठी उद्युक्त करायला हवे. यामुळे आपण भविष्यात ज्या समस्यांना तोंड देणार आहोत, त्यासाठी मदत मिळेल’


- Advertisement -

हे वाचा-आर. माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’चे नरेंद्र मोदींकडून कौतुक

- Advertisement -