घर मनोरंजन चिमुकल्याने म्हटली संकर्ष कऱ्हाडेच्या नाटकातील कविता, व्हिडिओ व्हायरल

चिमुकल्याने म्हटली संकर्ष कऱ्हाडेच्या नाटकातील कविता, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

मराठी सिनेसृष्टीतील कलाकार संकर्ष कऱ्हाडे हा नेहमीच प्रक्षेकांचे नाटकातून असो किंवा टेलिव्हिजवरील एखादा शो यामधून मनोरंजन करत असतो. या व्यतिरिक्त तो सोशल मीडियात ही फार अॅक्टिव्ह असतो. याच पार्श्वभूमीवर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये एक चिमुकल्याने ‘पंढरीच्या विठुराया’ ही कविता गात असल्याचे दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात फार व्हायरल होत आहे. तसेच मुलाचे कौतुक ही केले जात आहे.

संकर्षणने त्याच्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, नियम व अटी लागूच्या बालगंधर्व प्रयोगानंतर ह्या छोट्या दोस्ताने माझी “पंढरीच्या विठूराया..” हि कविता मला खूप आवडते .. मी ती पाठ केली आहे .. आणि शाळेत सादर पण केली .. असं सांगत मनापासून म्हणुन दाखवली.. भेटायला आलेले सगळे प्रेक्षक थांबून त्याचा performance पाहात होते.. मी त्यातला थोडा भाग रेकॉर्ड केला .. आणि शेअर करतोय.. असेच प्रेम करत रहा…

- Advertisement -

सध्या संकर्षण कऱ्हाडे ‘नियम व अटी’ आणि ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात काम करत आहे. तर संकर्षण या सर्व गोष्टींव्यतिरिक्त सोशल मीडियात त्याच्या खासगी आयुष्याचे फोटो ही शेअर करत असतो.

- Advertisement -

 


हेही वाचा: ‘रावरंभा’ चित्रपटाचा पार पडला दिमाखदार संगीत अनावरण सोहळा

- Advertisment -