घरमनोरंजनBhajan Sopori Death: प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन

Bhajan Sopori Death: प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन

Subscribe

काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले पंडित भजन सोपोरी हे सुफियाना घराण्याचे वारसदार आहेत.

जगप्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा यांच्या निधनातून कलाप्रेमी सावरत नाही तोवर प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधनाची बातमी समोर येत आहे. संतूर वादक भजन सोपोरी यांचे काल सायंकाळी निधन झालं. (Santoor Maestro Pandit Bhajan Sopori)

संतूर वादक भजन सोपोरी यांचा जन्म 1948 साली श्रीनगर येथे झाला, त्यांचे पूर्ण नाव भजनलाल सोपोरी असे आहे.  त्यांचे वडील पंडित एस.एन.सोपोरी हे देखील एक प्रसिद्ध संतूर वादक होते. भजन सोपोरी यांनी संतूरचे ज्ञान त्यांचे आजोबा एस.सी.सोपोरी आणि वडील एस.एन.सोपोरी यांच्याकडून मिळाले आहे. त्यामुळे संतूर वादनाचे ज्ञान त्यांना वारसानेच मिळाले असे म्हणता येईल, त्यामुळे आजोबा आणि वडिलांकडूनचं भजनलाल सोपोरी यांनी गायन आणि वादन शैलीचे शिक्षण घेतले, त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून पाश्चात्य शास्त्रीय संगीताचेही शिक्षण घेतले. (Bhajan Sopori son)

- Advertisement -

काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले पंडित भजन सोपोरी हे सुफियाना घराण्याचे वारसदार आहेत. (Bhajan Sopori Gurugram) आजोबा आणि वडील संतूर वादनात निपुण असल्याने त्याचा वारसा पुढे नेण्याचे काम पंडित भजन सोपोरी यांनी केले. पंडित भजन सोपोरी यांनी नट योगा ऑन संतूर हा अल्बम रिलीज केला. एवढेच नाही तर त्यांनी (सा,मा,पा) सोपोरी अकादमी फॉर म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्टचे संस्थापक आहेत. शास्त्रीय संगीताचा प्रसार करणे हा या अकादमीचा मुख्य उद्देश आहे. पंडित भजन सोपोरी यांच्या जीवनप्रवासावर नजर टाकली तर ते भारतातील एकमेव शास्त्रीय संगीतकार आहेत ज्यांनी संस्कृत, अरबी, पारसीसह देशातील जवळपास सर्व भाषांमध्ये चार हजारांहून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे. (Bhajan Sopori music)

पंडित भजन सोपोरी यांनी तीन रागांची रचना केली आहे. यामध्ये राग लालेश्वरी, राग पटवंती आणि राग निर्मल रंजनी यांचा समावेश आहे. सोपोरी यांनी देशातील राष्ट्रीय एकता आणि अखंडतेसाठी विविध गाण्यांचे रि-ट्यून तयार केले आहेत. यामध्ये कदम-कदम बढाए जा, सरफरोशी की तमन्ना, विजयी विश्व तिरंगा प्यारा, हम होंगे कामयाब, इत्यादी प्रमुख गाण्यांचा समावेश आहे. (Bhajan Sopori Abhay Sopori)


Singer KK funeral : हम रहे या ना रहे कल! गायक केके अनंतात विलीन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -