गेल्या कित्येक दिवसांपासून छावा सिनेमाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहात होते. हा सिनेमा 14 फेब्रुवारीला अखेर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी छावा सिनेमाने जवळपास 31 करोड कमविले. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना पडद्यावर झळकला आहे. या सिनेमात अनेक मराठी कलाकारांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, याच सिनेमातील एका मराठी कलाकाराच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने या चित्रपटात रायाजीची भूमिका साकारली आहे. मराठा मावळा म्हणून अभिनेता संतोष जुवेकरने आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप उमटवली आहे. त्यामुळे विकी कौशलच्या या चित्रपटात संतोष जुवेकर भाव खाऊन गेला आहे, असे म्हटले जात आहे. चित्रपटातील संतोषचा उत्कृष्ट अभिनय पाहून सर्वत्र संतोषचे कौतूक होत आहे.
अभिनेता संतोष जुवेकरसह या चित्रपटात अनेक मराठी कलाकार आहेत. या सिनेमात धाराऊच्या भूमिकेत नीलकांती पाटेकर आहेत. तर शुभंकर एकबोटे याने धनाजी ही भूमिका साकारली आहे. सारंग साठ्ये गणोजी तर सुव्रत जोशी कान्हाजीची भूमिका साकारत आहे. अभिनेता मनोज कोल्हटरकदेखील छावामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सूर्या हा भूमिकेत अभिनेता आस्ताद काळे साकारत आहे.
हेही पाहा –