घरमनोरंजन'गोव्याला गेलो तरी २० - २५ हजार खर्च होतात'. संतोष जुवेकरची दत्तक...

‘गोव्याला गेलो तरी २० – २५ हजार खर्च होतात’. संतोष जुवेकरची दत्तक पालक होण्याचं आवाहन करणारी पोस्ट चर्चेत

Subscribe

संतोष जुवेकराने त्याच्या सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्या पोस्ट मधून त्याने त्याच्या चाहत्यांना सुद्धा एक आवाहन केले आहे. संतोष जुवेकरच्या या पोस्टची सध्या सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे.

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत घराघरात पोहोचालेला अभिनेता संतोष जुवेकर(santosh juvekar). संतोष जुवेकराने आजतागायत झेंडा(zenda), मोरया(morya), एक तारा आणि रेगे या चित्रपटांमधून दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या भूमिकांना प्रेक्षकांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला. संतोष जुवेकरचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे. सांतोष जुवेकर सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच प्रमाणावर सक्रिय असतो. संतोष जुवेकराने त्याच्या सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्या पोस्ट मधून त्याने त्याच्या चाहत्यांना सुद्धा एक आवाहन केले आहे. संतोष जुवेकरच्या या पोस्टची सध्या सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा – अशोक पत्कींच्या संगीत साजाने पुन्हा एकदा साकारतोय ‘श्यामची आई’ चित्रपट

- Advertisement -

आणखी वाचा – आरोह वेलणकरचा संजय राऊत यांना टोला, म्हणाला राऊत अजून…

- Advertisement -

अभिनेता संतोष जुवेकरने(santosh juvekar) मालिका, चित्रपट आणि नाटक या सर्वच प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. संतोष जुवेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी सुद्धा कनेक्ट असून तो सक्रिय सुद्धा असतो. तो त्याच्या नवीन प्रोजेक्ट आणि कामासंदर्भातील माहिती आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतो. नुकतंच संतोष जुवेकरने ‘दत्तक पालक’ व्हा असं आवाहन करणारी पोस्ट स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.

आणखी वाचा – रणवीर सिंह साकारणार ‘शक्तिमान’ची भूमिका

संतोष जुवेकरची इंस्टाग्राम पोस्ट

“घरच्यांना बरोबर मित्र मैत्रिणींना बरोबर बाहेर कधी नुसतं जेवायला गेलो तरी ६ ७ हजार bill सहज येत. मग जर फक्त १० हजारात आपण एखाद्या
मुलाचं/मुलीचं वर्षाचं अन्न नक्कीच पुरवू शकतो.

वर्षातन एखादी गोव्याची trip केली तरी २० २५ हजार सहज खर्च होतात आपले. मग फक्त १५ हजारात एखाद्या मुलाचा/मुलीचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च नक्कीच करून त्या मुलाचे/ मुलीचे दत्तक पालकत्व स्वीकारू शकतो आपण.

आणि हे सगळं ज्यांना मनापासून करावंसं वाटतं आणि जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत आणि ज्यांना कुठलीही अडचण नाही त्यांनी नक्कीच कराव पण मदत म्हणुन नाही तर कर्तव्य म्हणुन.आणि ही बळजबरी नाही”,

असं संतोष जुवेकर त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या पोस्ट मध्ये म्हणाला आहे.

आणखी वाचा – ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आलिया भट्टने हनीमूनबद्दल केला खुलासा, व्हिडीओ व्हायरल

संतोष जुवेकरचा(santosh juvekart) ‘हिडन’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म(ott platform) वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात संतोष जुवेकर एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. संतोष जुवेकरचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे. संतोष जुवेकर सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो.

 

 

 

 

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -