Video: माधुरी दीक्षितला टक्कर द्यायला आली ‘ही’ ‘दंगल गर्ल

सान्या मल्होत्राच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

सौ. सोशल मिडीया

अभिनेता अमिर खानसोबत दंगल या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सान्या ही माधुरीच्या सुप्रसिद्ध ‘हमको आजकल है इंतजार (Humko Aajkal Hai Intezaar)’ या गाण्यावर माधुरीच्या स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. सान्य़ा मल्होत्राने या डान्सचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना तिने असे सांगितले की, ‘गेल्या काही दिवसांपासून मी डान्स केला नव्हता आणि त्याला मिस करत होती’ या व्हिडिओमधून ‘हमको आजकल है इंतजार (Humko Aajkal Hai Intezaar) ‘ या गाण्यावर सान्या माधूरीच्या गाण्यावर नाचताना तिच्यातील माधुरीचा अंदाज समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा सान्याच्या डान्सवर चाहत्यांनी खूप कमेंट केल्या असून तिचे कौतुक देखील करत आहेत.


हेही वाचा- #NoBra कॅम्पेन सुरू करणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध विदेशी अभिनेत्रीचा मृत्यू