Kathal : कटहलचा फर्स्ट लूक आऊट, सान्या मल्होत्रा दिसणार पोलिसी वेशात

सान्या या सिनेमात एका महिला पोलीस इंस्पेक्टरची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचा पहिला लूक नुकताच समोर आला असून सान्याचा नवा अवतार प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

Sanya Malhotra starer Kathal first look revealed
Kathal : कटहलचा फर्स्ट लूक आऊट, मधून सान्या मल्होत्रा दिसणार पोलीसी वेशात

Kathal : अभिनेत्री सान्या मल्होत्रा गेल्या काही काळापासून सतत नव नवे सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिची प्रत्येक भूमिका तिच्या पहिल्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. सान्या मल्होत्रा पुन्हा एकदा एका नवीन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कटहल या नव्या सिनेमात सान्या नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सान्या या सिनेमात एका महिला पोलीस इंस्पेक्टरची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचा पहिला लूक नुकताच समोर आला असून सान्याचा नवा अवतार प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

कटहल सिनेमात सान्या सोबत अभिनेते अनंत जोशी देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. एका छोट्या शहराची कहाणी सिनेमात दाखवण्यात आली असून एका स्थानिक नेत्याच्या घरातून कटहल म्हणजे फणस चोरीला जातो. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे प्रकरण महिला पोलीस अधिकारी सान्या मल्होत्रा हाताळते. सान्या मल्होत्रा महिमा या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanya Malhotra💥 (@sanyamalhotra_)

कटहल सिनेमाच्या माध्यमातून यशवर्धन मिश्रा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.सान्याने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सिनेमातील तिचा पहिला लूक शेअर केला आहे. ज्यात ती पोलीस स्टेशनमध्ये यूनिफॉर्म घालून बसलेली पाहायला मिळत आहे. एक केस जी फुल ऑन ड्रामा, सस्पेंस आणि कॉमेडीने भरलेली आहे. यात एकच वस्तू मिसिंग आहे ती म्हणजे कटहल ( फणस ) ती लवकरच नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या पहिल्या लूकमध्ये तरी सिनेमा धमाकेदार असेल असे वाटत आहे.

अभिनेत्री सान्या मल्होत्राने याआधी लूडो, पग्लैट आणि मीनाक्षी सुंदरेश्वर हे सिनेमे नेटफ्लिक्सवर रिलीज झाले आहेत. या सिनेमातील सान्याच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. काही दिवसांपूर्वी सान्याचा लव्ह हॉस्टल हा सिनेमा देखील रिलीज झाला होता. ज्यात विक्रांत मेस्सी आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत होते.


हेही वाचा – ‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘नीरजा’पर्यंत; महिलांवरील आधारित ‘या’ चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक गल्ला कमावला