HomeमनोरंजनSanya Malhotra : महिलांकडून समाजाच्या अपेक्षांवर सान्या मल्होत्राचे परखड विधान

Sanya Malhotra : महिलांकडून समाजाच्या अपेक्षांवर सान्या मल्होत्राचे परखड विधान

Subscribe

आगामी सिनेमा Mrs च्या प्रमोशन इव्हेंटदरम्यान अभिनेत्री सान्या मल्होत्राने काही महत्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. यावेळी तिने अत्यंत परखडपणे समाजातील त्या घटकांवर भाष्य केले जे स्त्रियांना लग्नानंतर मुलांचा जन्म झाला की नोकरी सोडण्यास जबरदस्ती करतात.

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिचा आगामी सिनेमा Mrs मूळे प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाबाबत तिचे चाहते फार उत्सुक आहेत. अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. माहितीनुसार, या सिनेमाच्या माध्यमातून सान्या मल्होत्रा एका हाउसवाइफची भूमिका साकारते आहे. जिचे संपूर्ण आयुष्य तिचा पती आणि कुटुंब यांच्याभोवती फिरतंय. असे असूनही कुटुंबाकडून तिला मिळायला हवा तो सन्मान मिळत नाही. तिच्या पदरी केवळ दुःख आणि निराशा पडतेय. (sanya malhotra viral statement on the expectations of society from women)

समाजाच्या स्त्रियांकडून खूप अपेक्षा आहेत..

आगामी सिनेमा Mrs च्या प्रमोशन इव्हेंटदरम्यान अभिनेत्री सान्या मल्होत्राने काही महत्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. यावेळी तिने अत्यंत परखडपणे समाजातील त्या घटकांवर भाष्य केले जे स्त्रियांना लग्नानंतर मुलांचा जन्म झाला की नोकरी सोडण्यास जबरदस्ती करतात. अभिनेत्रीने म्हटले, ‘आम्हा महिलांकडून समाजाच्या फार अपेक्षा असतात. आजकाल ही गोष्ट फार सामान्य झाली आहे की, विवाहित महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर नोकरी सोडून द्यायची. पण बाळ जर दोघांचे आहे तर त्याची जबाबदारीदेखील दोघांची असते. ती दोघांनीही पेलली तरच याला एक उत्तम बॅलन्स म्हणता येईल’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanya Malhotra (@sanyamalhotra_)


या विषयावर Mrs सिनेमाची दिग्दर्शिका आरती यादवने देखील आपले मत व्यक्त केले आहे. ANI सोबत बोलताना तिने म्हटले, ‘महिलांना एका गोष्टीची निवड करण्याबाबत सक्ती करू नये. लग्न ही कंसेप्ट पाहता यात महिलांना करिअर आणि स्वप्नांसाठीदेखील तितकीच जागा मिळायला हवी जितकी बाकी गोष्टींसाठी मिळते. असं का होतं की लग्नानंतर महिला आपली जिद्द सोडून देतात आणि महत्वाकांक्षा संपवून टाकतात?’

OTT वर रिलीज होणार

या सिनेमाविषयी बोलायचे झाले तर, Mrs मध्ये अभिनेत्री सान्या मल्होत्रा मध्यवर्ती भूमिकेत आहे. एक नवी नवरी तिच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या आव्हानांसाठी सज्ज होते. पण ही नवी सुरुवात तिच्या आयुष्याचा चेहरा मोहरा बदलून टाकते. असे एका विवाहित स्त्रीच्या आयुष्याभोवती फिरणारे कथानक असलेला हा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर येत्या 7 फेब्रुवारी 2025 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत या सिनेमाचा प्रीमियर अनेक नामांकित फिल्म फेस्टिवलमध्ये केला गेला आहे.

मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक

अभिनेत्री सान्या मल्होत्रा अभिनित हा सिनेमा एका मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. मल्याळम सिनेमाचे नाव ‘द ग्रेट इंडियन किचन’ असे आहे. या सिनेमाचे कथानक देखील असेच काहीसे आहे. एक मुलगी अत्यंत सुंदर नर्तिका असते. जी कुटुंबाच्या दबावाखाली येऊन लग्न करते. येणाऱ्या काळात तिला आपल्या करिअरबाबत फार अपेक्षा असतात. पण लग्नानंतर तिचे आयुष्य घर, घरातली माणसं, जेवण आणि भांडी यांच्यापुरता मर्यादित होते. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म अमॅझॉन प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

हेही पहा –

Tere Ishk Mein : अधुऱ्या प्रेमाची थरारक गोष्ट, धनुष- क्रितीच्या तेरे इश्क में सिनेमाचा टिझर रिलीज