Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सपना चौधरीचे कार अपघातात निधन झाल्याची बातमी व्हायरल !

सपना चौधरीचे कार अपघातात निधन झाल्याची बातमी व्हायरल !

वृत्तानंतर सपनाच्या चाहत्यांना प्रचंड मोठ्ठा धक्का बसला होता. चाहत्यांनी सपनाच्या पोस्टवर श्रद्धांजली वाहण्यास देखील सुरूवात केली होती.

Related Story

- Advertisement -

हरियाणवी डांसर सपना चौधरीने (sapna choudhary)आपल्या दिलखेच डांस आणि अदांनी चाहत्यांना पुरते घायाळ केले आहे. सपना चौधरीची लोकप्रियता आज फक्त हरियाणा पुरतीच मर्यादीत राहीली नसून प्रत्येक सिनेइंडस्ट्रीत सपना चौधरीने आपली छाप पाडली आहे. सपनाचा स्टेजशो पाहण्यासाठी आजही लाखो चाहत्यांची गर्दी जमा होते. सपनाने केलेला प्रत्येक डांस हीट ठरला. सपना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून आपल्या व्यक्तीगत तसेच व्यावसायिक जीनाशी निगडीत अनेक घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करते. तिचे इंस्टाग्रामवर तब्बल 3.4 मिलीयन फॉलोवर्स असून सपनाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. नुकतच सपनाचे एका अपघातात निधन झाले आहे अशी अफवा सोशल मीडियावर व्हायरल होतेय तसेच या वृत्तानंतर सपनाच्या चाहत्यांना प्रचंड मोठ्ठा धक्का बसला होता. चाहत्यांनी सपनाच्या पोस्टवर श्रद्धांजली वाहण्यास देखील सुरूवात केली होती. दरम्यान, सपनाचा तिच्या कुटुंबीयासोबत सुरक्षित असल्याचे कळतेय तसेच या सर्व अफामध्ये तिचा एक धमाकेदार व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे आणि सर्वत्र या डांसची चर्चा होत आहे.(sapna choudhary death news rumors viral)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

- Advertisement -

सपना चौधरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती आरशासमोर बसून स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ बनवताना दिसत आहे. त्याच वेळी, आपण पाहू शकता की यावेळी सपनाचा मेकअप आट्रीस्ट तिचे केस बनवताना दिसतो. त्याचबरोबर, व्हिडीओमधील सपनाची एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहे. व्हिडिओमध्ये सपना ‘मोटी मोती अंख … मेरी कार्ती नॉटी ….’ या गाण्यावर डांस करत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्याच वेळी, हजारो चाहत्यांनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला आहे.


हे हि वाचा – वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेला होणार अटक?

- Advertisement -