Rait Zara Si Song: अतरंगी रेचं दुसर गाणं प्रदर्शित, अरजीत सिंहच्या आवाजात साराची लव्ह स्टोरी

गाण्यात सारा अली खानचं धनुष सोबत लग्न होतं आणि ती लग्नानंतर धनुषला तिची लव्ह स्टोरी सांगताना दिसत आहे

sara ali khan akshay kumar dhanush starer Atrangi re movie Rait Zara Si new song release
Rait Zara Si Song: अतरंगी रेचं दुसर गाणं प्रदर्शित, अरजीत सिंहच्या आवाजात साराची लव्ह स्टोरी

बॉलिवूडचा मोस्ट अवटेड ‘अतरंगी रे’ सिनेमा २४ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांच धम्माल त्रिकूट सिनेमात पहायला मिळणार आहे. सारा अली खानच्या ‘चका चका’ गाण्यानंतर आता सिनेमाचं दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चका चक गाण्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. दुसरं गाण जरी थोड इमोशनल असलं तरी प्रेक्षकांना प्रचंड भावलं आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरजीत सिंहच्या आवाजातलं ‘रेत जरा सी हे’ गाणं प्रदर्शित झालं आहे. अरजीत सिंह आणि शाशा तिरुपती यांच्या आवाजातील या गाण्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गाण्याच्या सुंदर कंम्पोझिशनने सिनेमाला चार चाँद लावले आहेत.

सिनेमातील हे गाणं जितकं इमोशल आहे तितकंच रोमँटिक देखील आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच सारा धनुषला तिची लव्ह स्टोरी सांगत आहे. ‘लग रही है एक अलग ही प्यास सी क्यूकी अलग है रित जरा सी’, असं म्हणत साराने तिच्या सोशल मीडियावरुन सिनेमातील गाणं शेअर केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

गाण्यात सारा अली खानचं धनुष सोबत लग्न होतं आणि ती लग्नानंतर धनुषला तिची लव्ह स्टोरी सांगताना दिसत आहे. सिनेमात धनुष आणि अक्षय यांच्यापैकी एकाची निवड करायची आहे मात्र तिघेही नात्यात झालेल्या गुंत्याला सामोरे जात आहे आणि ते हा गुंता कसा सोडवणार हे सिनेमा पाहिल्यावर आपल्याला कळणार आहे.

आनंद एल राय यांच्यासोबतचा धनुषचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी दोघांनी रांझणा या सिनेमात एकत्र काम केलं आहे. तसंच सारा अली खान आणि अक्षय कुमारसोबत धनुष पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सिनेमात सारा रिंकू हे पात्र साकारणार आहे. संपूर्ण सिनेमात जबरदस्त लव्ह ट्रॅगल प्रेक्षकांना पाहता येणार आहे.


हेही वाचा – Upcoming Web Series & Films: डिसेंबर महिन्यात मनोरंजनाचा डबल डोस! दमदार सिनेमा अन् वेब सीरीजचा धमाका