जोडी जमली! सारा अली खानच होणार विकी कौशलची बायको

sara ali khan and vicky kaushal ready to our romantic comedy based new movie
जोडी जमली! सारा अली खानच होणार विकी कौशलची बायको

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याचे कतरिना कैफसोबत अफेअरच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. अशातच दोघांनी गुपचुप साखरपुडा उरकल्याच्याही चर्चा रंगतायत. पण आता बॉलिवूडमध्ये भलत्याच चर्चांना उधान आले आहे. यात विकी आता अभिनेत्री सारा अली खान हिचा पती होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र सारा आणि विकीची जोडी नेमकी जमली कशी ? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

मात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यात नाही, तर आगामी चित्रपटात विकी कौशल सारा अली खानच्या पतीच्या भूमिकेत झळकणार आहे. सारा खान आणि विकी कौशल तरुणाईचे आवडते कलाकार मानले जातात. त्यामुळे त्यांचा चित्रपटांनाही चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळतो. साराने आत्तापर्यंत केदारनाथ, कुली नंबर 1 आणि सिंम्बा यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या उत्कृष्ट अभिनयाची मोहर उमटवली. तर विकीनेही संजू, उरी सारख्या चित्रपटांतून आणि जाहिरातींमधून अभिनयाचे वेगळेपण सिद्ध केले आहे. आत्ता लवकरचं विकी कौशल आणि सारा अली खान लक्ष्मण उतेकर यांच्या एक रोमँटिक कॉमेडी चित्रपटामध्ये झळकणार आहेत. या दोघांना पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

यापूर्वी यामी गौतमचा पती आदित्य धरने सारा अली खान आणि विकी कौशलला एकत्र घेऊन ‘द इम्मॉरटल अश्वत्थामा’ चित्रपट बनवण्याचा प्लॅन केला होता. मात्र काही कारणास्तव चित्रपट बनू शकला नाही. मात्र नव्या चित्रपटामुळे चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

लक्ष्मण उत्तेकर यांच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात सारा अली खान, विकी कौशल झळकणार आहे. यात विकी कौशल आणि सारा अली खान पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार असून हे कपल स्वतःच घर असावं असं स्वप्न पाहताना दाखवण्यात येणार आहे. मध्य प्रदेशातील एका घटनेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. तसेच चित्रपटात पंतप्रधान घरकुल योजनेची माहिती करून देतानाही दिसून येणार आहे. संपूर्ण चित्रपटाची कथा या गोष्टीच्या भोवतीच फिरणारी आहे. याशिवाय चित्रपटात विकी आणि साराच्या रोमॅन्ससोबतचं ड्रामा आणि कॉमेडीसुद्धा पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचे शुटिंग उज्जैन, ग्वालेहर आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. येत्या नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. यापूर्वी या चित्रपटासाठी आयुष्यमान खुरानाला साईन करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तवनंतर विकी कौशलला फाईनल करण्यात आले.