Video: पाहा रॅम्पवॉक करताना सारा पडता पडता वाचली!

सारा आणि कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

sara ali khan fall on stage karthik aryan took over video viral on social media
Video: पाहा रॅम्पवॉक करताना सारा पडता पडता वाचली!

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच एका चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. सध्या या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सारा अली खान रॅम्पवॉक करताना स्टेजवर पडणार होती. मात्र कार्तिकने तिला पडण्यापासून वाचवलं आहे. या व्हिडिओने चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसंच चाहते हा व्हिडिओ पाहून खूप साऱ्या प्रतिक्रिया देत आहेत.

स्टार स्क्रीन अॅवॉर्ड दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये सारा स्टेजवर आल्यानंतर कार्तिक तिला अनेक टास्क करायला सांगतो. याचं वेळी एका टास्कमध्ये तिला एका पायात हील घालून रॅम्पवॉक करायला सांगितला. तेव्हा तिने एका पायात हील घालून रॅम्पवॉक करायला सुरू केला. त्यावेळी ती काही पावलं चालल्यानंतर अडखळली आणि त्यामुळे अॅवॉर्ड फंक्शनमध्ये बसलेले सर्व सेलिब्रिटी घाबरले. मात्र कार्तिक आर्यने साराला सांभाळलं. कार्तिक आणि साराचा हा व्हिडिओ स्टार प्लसने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

सारा आणि कार्तिक लवकरच ‘आजकल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सारा ‘कुली नंबर १’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसंच सारासोबत वरुण धवन देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर कार्तिक आर्यन ‘दोस्ताना २’ आणि ‘भूल भुलैया २’ मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


हेही वाचा – Video: नेहा खानने सिद्धार्थ जाधवला नाचवले आपल्या तालावर!