Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन चित्रपटाच्या यशासाठी सारा अली खान पोहोचली महाकाल मंदिरात

चित्रपटाच्या यशासाठी सारा अली खान पोहोचली महाकाल मंदिरात

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्या सोबत अभिनेता विक्की कौशल देखील मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपटासाठी सारा आणि विक्की सध्या जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच आता साराचा आणखी एक नवा फोटो समोर येत आहे ज्यात ती उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचली आहे. यावेळी तिने भस्म आणि आरतीमध्येही सहभाग घेतला.

सारा अली खान पोहोचली महाकाल मंदिरात

सध्या सोशल मीडियावर सारा अली खानचा एक व्हिडीओ समोर येत आहे. ज्यात ती उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचली आहे. यावेळी तिने भस्म आणि आरतीमध्येही सहभाग घेतला. यावेळी विक्की कौशल तिच्यासोबत दिसला नाही. या व्हिडीओमध्ये सारा कपाळावर भस्म लावून महाकालची मनोभावे पूजा करताना दिसत आहे.साराच्या या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट्स करत आहे. नेटकरी साराचं कौतुक देखील करत आहेत.

गुलाबी साडीमध्ये दिसली सारा

- Advertisement -

महाकालच्या दर्शनासाठी जाताना साराने पारंपारिक लूक केला होता. यावेळी तिने भडक गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. या लूकमध्ये सारा सुंदर दिसत होती.

- Advertisement -

जरा हटके जरा बचके-सारा अली खानच्या रिलीजपूर्वी विकी कौशल भगवान भोलेनाथच्या आश्रयाला पोहोचला

दरम्यान, यापूर्वी लखनऊच्या शिव मंदिरातही सारा आणि विक्की पोहोचले होते. यावेळचे फोटो साराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते.

‘जरा हटके जरा बचके’ 2 जूनला होणार प्रदर्शित

विक्की कौशल आणि सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. लक्ष्मण उतरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून विक्की आणि सारा यात मुख्य भूमिका साकारत आहेत. यात विक्की कौशल कपिल ही भूमिका साकारत आहे. तर सारा अली खान सौम्या ही भूमिका साकारणार आहे.

 


हेही वाचा :

बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवरने लेकीसाठी खरेदी केली लक्झरी कार

- Advertisment -