घरताज्या घडामोडीगोलू पोलू साराचा 'हा' व्हिडिओ व्हायरल

गोलू पोलू साराचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. साराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. नुकताच साराने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा तिचा जुना व्हिडिओ असून तेव्हा तिचे वजन ९६ किलो होते. सारा फ्लाइटमध्ये झोपलेल्या मैत्रिणींचा व्हिडिओ करताना दिसत आहे. सोशल मीडियावर साराचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिलं की, ‘सादर करते सारा सारा सारा’

- Advertisement -

‘तेल मालिश’ या गाण्यावर साराने आपल्या मैत्रिणींचा व्हिडिओ बनवला आहे. तसेच तिने व्हिडिओत क्यूट एक्सप्रेशन दिले आहेत. साराच्या या व्हिडिओवर चाहते खूपसाऱ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युझर या व्हिडिओला क्युट म्हणतं आहेत तर काही जणं तिच्या आतापर्यंतच्या परिश्रमाबद्दल कौतुक करत आहेत.

- Advertisement -

लवकरच सारा अली खान बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनसोबत ‘लव आजकल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात सारा आणि कार्तिक व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रोमँटिक ड्रामा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली याने केलं आहे. सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणचा ‘लव आजकल’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. सारा आणि कार्तिकचा हा चित्रपट १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हेलेंटाईन डे’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – बिग बींना मागे टाकत ‘हा’ अभिनेता सोशल मीडियावर हीट!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -