Sara Ali khan ने सोडला नवाबी थाट, शेतात चालवला ट्रॅक्टर अन् बकऱ्याही चरवल्या

साराचे हे नवे फोटो तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरले आहेत. तसेच सारा इतकी मोठी अभिनेत्री असूनही तिचे पाय अद्याप जमीनीवर आहेत याचा देखील सर्वांना गर्व वाटत आहे.

Sara Ali Khan shared photos of driving tractor and grazing goats
Sara Ali khan ने सोडला नवाबी थाट, शेतात चालवला ट्रॅक्टर अन् बकऱ्याही चरवल्या

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali khan)  तिच्या क्यूट स्वभावामुळे कायम सर्वांच्या पसंतीस उतरते. सोशल मीडियावर देखील साराची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. सारा सतत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. सारा सध्या वर्केशनवर आहे. म्हणजेच सारा सुट्ट्या आणि कामाचा एकत्र आनंद घेत आहे. तिथलेच काही फोटो साराने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नवाबी थाटात राहणारी सारा थेट शेतात जाऊन ट्रॅक्टर आणि बकऱ्या चरवताना दिसत आहे. हा फोटो आहे बिहारमधील चाकिया या गावचा. सारा सध्या या गावात तिच्या नव्या प्रोजेक्टचे शुटींग करत आहे. तिचा हा नवा अवतरात पाहून तिच्या चाहत्यांनी तिचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती गावच्या शेतात उभी आहे. फोटोत तिने पर्पल कलरचा कुर्ता आणि गुलाबी कलरचा पायजमा घातला आहे. एका फोटोमध्ये सारा थेट ट्रँक्टरवर बसली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तीने बकऱ्या चरवण्यासाठी हातात काठी धरुन उभी आहे आणि एका शेतकऱ्याची बोलत आहे. साराचे हे नवे फोटो तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरले आहेत. तसेच सारा इतकी मोठी अभिनेत्री असूनही तिचे पाय अद्याप जमीनीवर आहेत याचा देखील सर्वांना गर्व वाटत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

‘बकऱ्या चरवणे, ट्रँक्टर चालवणे हा केवळ एका फोटोचा बहाणा, आणि सारा विशिंग इट वॉस डिफरेंट जमाना’, असे म्हणत साराने हे फोटो शेअर केले आहेत. साराच्या फोटोला काही वेळातच हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. सर्वांनी साराचे भरपूर कौतुक केले आहे.

साराचा नुकताच अतरंगी रे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. साराचे या सिनेमासाठी सर्वांनीच प्रचंड कौतुक केले आहे. अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना एकत्र पहायला मिळाली.


हेही वाचा – ऐन थंडीत Urfi Javedच्या हॉटनेसने नेटकरी घायाळ