Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन शुभमन बरोबर अफेयर आणि लग्नावर बोलली सारा

शुभमन बरोबर अफेयर आणि लग्नावर बोलली सारा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. सारा सध्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट 2 जून रोजी रिलीज झाली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सारा एका कार्यक्रमाला गेली असता तिला शुभमन गिल यांच्या अफेअर्सबद्दल पत्रकारांना विचारल्यावर तिने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

भविष्यात क्रिकेटरशी लग्न करणार का?, असा प्रश्न साराला विचारला होता. ती म्हणाली, “मी ज्या प्रकारची व्यक्ती आहे, त्या प्रकारे माझा पार्टनर निवडायचा आहे. मग, तो कोणत्याही क्षेत्रात काम करणारा आहोत की, मग तो डॉक्टर, बिझनेसमन किंवा क्रिकेटर असो, त्याने मला समजून घेणारा हवा आहे आणि हे कोणत्याही प्रोफेशनशिवात सर्वात महत्त्वाची गोष्टी आहे.

- Advertisement -


तू इंडिया क्रिकेटरला मधील लोकांना डेट करत आहेस का? या प्रश्नावर सारा म्हणाली, “मी ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य काढू शकेल, असा व्यक्ती मला अजून तरी भेटलेला नाही. मला जरा हटके जरा बचके टाइप व्यक्ती डेट करायला आवडेल”

 

सारा मंदिरात गेल्यामुळे झाली ट्रोल

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपूर्वी सारा ही उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेली आहे. यावेळी तिने भस्म आणि आरतीमध्येही सहभाग घेतला. या व्हिडीओमध्ये सारा कपाळावर भस्म लावून महाकालची मनोभावे पूजा करताना दिसत आहे. यानंतर साराचे नेटकऱ्यांनी कौतुक केले तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल देखील केले होते.

या ट्रोलर्सला साराने एका कार्यक्रमात उत्तर देना म्हणाले, “मी महाकालला जाईन त्याच भक्तीने मी अजमेर शरीफला जाणार आहे. मी जात राहीन. लोकांना वाटेल ते म्हणून देत, मला काही अडचण नाही. तुम्हाला एखाद्या ठिकाणची ऊर्जा आवडली पाहिजे. माझा उर्जेवर विश्वास आहे.”


हेही वाचा – ही तर मुस्लीम… महाकाल मंदिरात गेल्याने सारा ट्रोल

- Advertisment -