Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन IIFA मध्ये सारा आणि राखीचं कडाक्याचं भांडण; व्हिडीओ व्हायरल

IIFA मध्ये सारा आणि राखीचं कडाक्याचं भांडण; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्या सोबत अभिनेता विक्की कौशल देखील मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपटासाठी सारा आणि विक्की सध्या जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, अशातच आता साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सारा ड्रामा क्वीन राखी सावंतसोबत दिसत आहे.

राखी सावंतसोबत साराचं झालं भांडण

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात सारा अली खान आणि राखी सावंत एकमेकींसोबत भांडताणा दिसत आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला सारा आणि राखी एका बाथरुममधून बाहेर येतात आणि एकमेकींना अचानक धडकतात, एकमेकींना पाहून त्या दोघीही आश्चर्यचकित होतात. यावेळी राखी आणि सारा दोघीही सुंदर दिसण्यावरुन दावा करतात. यावेळी त्या दोघीही एकमेकींसोबत जोरजोरात भांडतात. त्यानंतर त्या दोघीही साराच्या चित्रपटातील ‘जरा हटके जरा बचके’ या गाण्यावर नाचू लागतात. त्यानंतर राखीने साराला मिठी देखील मारली. दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत.

‘जरा हटके जरा बचके’ 2 जूनला होणार प्रदर्शित

- Advertisement -

विक्की कौशल आणि सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. लक्ष्मण उतरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून विक्की आणि सारा यात मुख्य भूमिका साकारत आहेत. यात विक्की कौशल कपिल ही भूमिका साकारत आहे. तर सारा अली खान सौम्या ही भूमिका साकारणार आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा :

‘आदिपुरुष’मधील ‘राम सिया राम’ गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंड

- Advertisment -