सध्या करण जौहरचा मोस्ट पॉप्युलर टॉक शो ‘कॉफी विद करण सीजन-8’ बॉलिवूड कलाकारांच्या आयुष्यातील किस्स्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. या शो ची ओपनिंग बॉलिवूड मधील पॉवर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी केली. त्यानंतर बॉलिवूड मधील ब्रदर्स सनी देओल आणि बॉबी देओल या शो मध्ये दिसून आले होते. दरम्यान, नुकत्याच या शोमध्ये अनन्या पांडे आणि सारा अली खान आल्या होत्या. यावेळी करणने साराला अनेक प्रश्न विचारले.
या कार्यक्रमात करण जौहरने खुलासा केला की,एकेकाळी सारा आणि अनन्याने एकाच व्यक्तीला डेट केले होते. पुढे त्याने साराला, कार्तिक आर्यनसोबतचा तिचा ब्रेकअप आणि ब्रेकअपनंतर त्याच्याशी मैत्री करणं याबाबत तिला प्रश्न विचारला. यावर सारा म्हणाली की, “हे नेहमीच सोपे नसते. जेव्हा तुम्ही एखाद्याशी जोडले जाता, मग ती मैत्री असली तरीही किंवा व्यावसायिक, रोमँटिक संबंध असले तरी. विशेषत: मी अशा नात्यात गुंतते. जर त्यात सामील झाल्यास या गोष्टी तुमच्यावर परिणाम करतात.”
Finally thank you so much Sara Ali Khan 💜
For clearing all the confusion..#SaraAliKhan #ShubmanGill #SaraTendulkar pic.twitter.com/uzEHCKpbWu— Simping over ‘SHUBMAN’💀💜 (@crushxshraddha) November 9, 2023
पुढे सारा म्हणाली की, “खरंच काही फरक पडत नाही, असं काही नसतं. आज काहीही झालं, उद्या काहीही झालं. तर त्याचा तुमच्यावर परिणाम होतो. पण शेवटी तुम्हाला त्यातून पुढे जावे लागतं. इंडस्ट्रीत कोणीतरी तुमचा कायमचा मित्र राहील किंवा तुम्ही कधीही कोणाशीही बोलणार नाही असे म्हणणे योग्य नाही.”
अनन्यानेही केलं होतं कार्तिकला डेट
सारा आणि कार्तिक काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. अनन्या पांडेने देखील एकेकाळी कार्तिकला डेट केले होते. त्यांचेही नाते फार काळ टिकले नाही. सध्या अनन्या आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे.