घरताज्या घडामोडी'लग्न करणं सगळ्यात मोठी चूक', कंगनाच्या Lock Uppमध्ये अली मर्चंटचा हंगामा

‘लग्न करणं सगळ्यात मोठी चूक’, कंगनाच्या Lock Uppमध्ये अली मर्चंटचा हंगामा

Subscribe

सारानंतर आता आणखी एका स्पर्धकाची शोमध्ये एंट्री झाली आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून सारा खानचा पूर्वीचा पती आहे. पतीला शोमध्ये पाहून सारा चांगलीच शॉक झालीये. 

सध्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये असलेला कंगनाचा लॉकअप हा शो चांगलाच गाजतोय. अनेक कॉन्ट्रोवर्शिअल स्पर्धक लॉकअपमध्ये सहभागी झाले आहेत. अभिनेत्रा सारा खान काही दिवसांपूर्वी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली. साराने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शोमध्ये शेअर केल्या. सारानंतर आता आणखी एका स्पर्धकाची शोमध्ये एंट्री झाली आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून सारा खानचा पूर्वीचा पती आहे. पतीला शोमध्ये पाहून सारा चांगलीच शॉक झालीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ali Mercchant (@alimercchant)

- Advertisement -

टेलिव्हिजन अभिनेता अली मर्चंट कंगनाच्या लॉक अप शोमध्ये १४ वा स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. अलीची शोमधील एंट्री मेकर्सनी इन्स्ट्राग्रामवर शेअर केला आहे. खूब जमेगा रंग जब मे पहनूंगा कैदियो का रंग, असे म्हणत अलीने धमाकेदार एंट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे अलीची शोमध्ये एंट्री होताच बिग बॉस ४ फेम अभिनेत्री सारा खान सोबत झालेल्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली. सारा आणि अली आता एकाच शोमधून प्रेक्षकांना दिसणार आहे.

एका मुलाखतीत अलीने सारासोबत पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करण्यावरुन म्हटले, मला माहिती आहे हा शो आहे. मला हे ही माहिती आहे की सारा इथे तिचे इंडस्ट्रीमधील स्थान पुन्हा मिळवण्यासाठी आली आहे. मी आशा करतो तिला स्वत:वर विश्वास असेल आणि लवकरच ती या इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करेल.

- Advertisement -

सारासोबतच्या लग्नानंतर अनेक सवाल अलीला करण्यात आले होते. तेव्हा अलीने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याविषयी फार महत्त्वाचे विधान केले होते. लॉकअपमध्ये सहभागी झाल्यानंतर अलीच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अलीने म्हटले होते, लग्न करणे ही माझा आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती. आता लॉकअपच्या निमित्ताने सारा आणि अली समोरसमोर आले आहेत. त्यामुळे दोघे आता एकमेकांना कसे सामोरे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सारा खान आणि अली मर्चंट यांनी २०१०मध्ये लग्न केले. बिग बॉसच्या मंचावर दोघांचे लग्न झाले होते. परंतु हे लग्न दोन महिने देखील टिकू शकले नाही. दोन महिन्यांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा – ‘क्यू मराठी’ मनोरंजनाची नवीन टेलिव्हिजन वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -