Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन केदारनाथच्या सेटवर ड्रग्स घ्यायचे सारा-सुशांत ?, 'या'अभिनेत्याने केला खुलासा

केदारनाथच्या सेटवर ड्रग्स घ्यायचे सारा-सुशांत ?, ‘या’अभिनेत्याने केला खुलासा

सुशांतला कधीही नशा करताना तसेच ड्रिप वर पाहिले नाही ते सेट वर नॉर्मल अगदी साधेपणाने वावरत असे.

Related Story

- Advertisement -

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर तो आमली पदार्थाचे म्हणजेच ड्रग्सचे सेवन करत होता असा खुलासा झाला होता. सुशांतच्या प्रेयसी रिया चक्रवर्तीला  एनसीबीने अटक केल्यानंतर तिने सुशांत आणि सारा आली खान केदारनाथ सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान अनेकदा ड्रग्सचे सेवन करत होते असा खळबळजनक खुलासा रियाने केला होता. नुकतच केदारनाथ मध्ये सुशांत सोबत अभिनेता नीतीश भारद्वाज यांनी देखील सुशांत आणि सारा बद्दल एका मुलाखती दरम्यान महत्वाची बाब उघड केली आहे.टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना नीतीशला विचारण्यात आले की,” केदारनाथ सिनेमाच्या शूटिंग दरम्यन सुशांतला ड्रग्स घेत होता का?” याचे उत्तर देत नीतीश म्हणाले,”एक दिवस सहज मी आणि पुजा गौर आम्ही टीव्ही इंडस्ट्रीच्या बदलत्या कॉन्सेप्ट बद्दल चर्चा करत होतो याचदरम्यान ड्रग्सकडे गप्पा वळू लागल्या यांतर साराने मला सांगितलेतिने सुद्धा सिनेसृष्टीतील ड्रग्सच्या समस्येबद्दल अनेकदा ऐकले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek kapoor (@gattukapoor)

- Advertisement -

मला पुर्णपणे लक्षात आहे की मी तिला यापासून दूर रहण्यास संगितले होते. कारण तिचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. यानंतर सारा मला  म्हणाली. मी कधी ड्रग्सला हात देखील लावला नाही.आणि असे कधी करणार सुद्धा नाही. तसेच सुशांतला मी अनेकदा स्मोक करताना पहिले होते. माझ्या मते तो खूप हुशार बुद्धिमान व्यक्ती होता. जे व्यक्ती ड्रग्सचे सेवन करतात त्यांची बुद्धिमत्ता इतकी तल्लख नसते. मला कोणत्याही प्रकारचे व्यसन नाहीये पण समोरचा व्यक्तीने जर ड्रग्स किंवा सिगारेट घेत असेल तर त्याचा वास लगेच येतो.मी सारा आणि सुशांतला कधीही नशा करताना तसेच ड्रिप वर पाहिले नाही ते सेट वर नॉर्मल अगदी साधेपणाने वावरत असे.


हे हि वाचा – तुटलेल्या कार्यालयाची पाहणी करण्यास कंगना पोहचली मुंबईत
- Advertisement -