Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन सारा तेंडुलकरचा फॅमिली फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले शुभमन कुठेयं?

सारा तेंडुलकरचा फॅमिली फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले शुभमन कुठेयं?

Subscribe

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. सारा अनेकदा तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या अफेअर संबंधित बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मागील काही महिन्यांपासून साराचे नाव भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध खेळाडू शुभमन गिलसोबत जोडले जात आहे. मात्र, अद्याप या दोघांच्या अफेअरबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही.

सारा तेंडुलकरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरबद्दल सोशल मीडियावर नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. दरम्यान, सध्या सारा तेंडुलकरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो सचिन तेंडुलकरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये सारा तेंडुलकर तिच्या वडिलांसोबत आणि आईसोबत दिसत असून यात साराने हातात बॉल पकडलेला दिसत आहे. सारा तेंडुलकरच्या या फोटोवर अनेक यूजर्स कमेंट्समध्ये शुभमन गिलबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘शुभमन गिलची कमेंट कुठे आहे’. तर आणखी एका यूजरने साराला विचारले – शुभमन गिल कसा आहे ?

- Advertisement -

दरम्यान, सोशल मीडियावर काही नेटकरी शुभमनचं नाव सारा अली खानसोबत जोडत आहेत. तर काहीजण शुभमनचं नाव सारा तेंडुलकरसोबत जोडत आहेत. मात्र, या दोघींपैकी शुभमन नक्की कोणाला डेट करतोय? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.


हेही वाचा :

अमिताभनंतर अनुष्का शर्मानेही केली बाईक राइड; पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -