Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ही तर मुस्लीम... महाकाल मंदिरात गेल्याने सारा ट्रोल

ही तर मुस्लीम… महाकाल मंदिरात गेल्याने सारा ट्रोल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्या सोबत अभिनेता विक्की कौशल देखील मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपटासाठी सारा आणि विक्की सध्या जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच सारा बुधवारी उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. जिथे तिने महाकालची मनोभावे पूजन केले. यादरम्यानचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी साराचे कौतुक केले तर काहींनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. आता या ट्रोलर्सला साराने चांगलच उत्तर दिलं आहे.

महाकाल मंदिरात गेल्याने सारा ट्रोल

बुधवारी सकाळी सारा अली खान उज्जैन पोहोचली होती. जिथे तिने महाकालाचे दर्शन घेतले. यादरम्यान, साराने पारंपारिक लूक केला होता. यावेळी तिने भडक गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. या लूकमध्ये सारा सुंदर दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

- Advertisement -

हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सारा सोशल मीडियावर खूप ट्रोल होऊ लागली. ही मुस्लिम असून हिंदू मंदिरात जाऊन पूजा कशी करु शकते? असे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.

साराने दिलं उत्तर

एका मुलाखतीत साराला ट्रोलर्सच्या या टीकेबाबत विचारण्यात आलं. तेव्हा तिने उत्तर दिलं की, “लोक त्यांना जे हवे ते म्हणू शकतात, मला कोणतीही अडचण नाही. मी माझे काम खूप गांभीर्याने घेते. मी लोकांसाठी, तुमच्यासाठी काम करते. तुम्हाला मी आवडत नसल्यास मला माफ करा, परंतु माझ्या स्वतःचा वैयक्तिक विश्वास आहे.ज्या भक्तीने मी बंगला साहिब किंवा महाकालला जाईन त्याच भक्तीने मी अजमेर शरीफला जाणार आहे. मी जात राहीन. लोकांना वाटेल ते म्हणून देत, मला काही अडचण नाही. तुम्हाला एखाद्या ठिकाणची ऊर्जा आवडली पाहिजे. माझा उर्जेवर विश्वास आहे.” असं सारा म्हणाली.

- Advertisement -

 


हेही वाचा :

अंबानी कुंटुंबात झाला राजकन्येचा जन्म

- Advertisment -