सरदार उधम सिंह पर्समध्ये ठेवत होते आपल्या ‘या’ रोल मॉडेलचे फोटो

सरदार ऊधम यांच्यावर भगत सिंह यांचा प्रभाव इतका अधिक होता कि नंतरचे लोक सरदार उधम यांच्याकडून प्रेरीत होऊन त्यांना आपला गुरु, एक संरक्षक मानू लागले होते

Sardar Udham Singh considered Bhagat Singh as his Guru
सरदार उधम सिंह पर्समध्ये ठेवत होते आपल्या 'या' रोल मॉडेलचे फोटो

सरदार उधम सिंह यांच्या कहाणीवर आधारित ‘सरदार उधम’ (Sardar Udham) हा सिनेमा अमेझॉन प्राईम व्हिडीओवर १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. एक चित्रपट जो २१ वर्षांहूनही अधिक काळ निर्मात्याच्या मनात होता तो प्रत्यक्ष दर्शकांसमोर येणार आहे. हा चित्रपट भारतातील सर्वात बहादुर अशा सरदार उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे.  भारत देशाने खूप साऱ्या महान अशा योध्यांना, सेनानायकांना आणि क्रांतीकारकांना पहिले आहे. भगत सिंह हे देशातील सर्वात सम्मानिय आणि सर्वश्रुत असे क्रांतिकारक होते आणि त्यांनी अनेकांना प्रेरित केले होते याविषयी कोणाचेच दुमत नाही. त्यांचे असेच एक शिष्य सरदार उधम सिंह देखील होते. सरदार ऊधम यांच्यावर भगत सिंह यांचा प्रभाव इतका अधिक होता कि नंतरचे लोक सरदार उधम यांच्याकडून प्रेरीत होऊन त्यांना आपला गुरु, एक संरक्षक मानू लागले होते इतके कि आपल्या बटव्यात त्यांचे फोटो देखील ठेवत असत.

इतिहास आपल्याला शिकवण्यात कधीच अयशस्वी होत नाही आणि अशा व्यक्तिमत्वावर आधारित चित्रपट हे दाखवतात की त्यापासून अजून किती काही शिकणे बाकी आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणाऱ्या ‘सरदार उधम’ने चाहत्यांना आधीच खूप उत्साहित केले असून निर्मात्यांनी चित्रपट बनवताना आणि उधम सिंहांची कहाणी सर्वांपर्यंत पोहोचवण्यात काहीच कसर सोडलेली नाही.

जे एक वीर आणि देशभक्त व्यक्ति होते, ज्यांनी भारतातील ब्रिटिश पारतंत्र्याविरुद्ध नि:स्वार्थ आणि साहसपूर्वक लढाई लढली. हा चित्रपट १९१९च्या जालियन बाग नरसंहारात निर्दयपणे मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्येचा बदला घेणाऱ्या सरदार उधम यांच्या अवघड मिशनवर केंद्रित आहे.

शूजीत सरकार यांच्याद्वारे दिग्दर्शित, रोनी लाहिरी आणि शील कुमार यांच्याद्वारे निर्मित या चित्रपटात विक्की कौशल यांच्यासोबत शॉन स्कॉट, स्टीफन होगन, बनिता संधू आणि क्रिस्टी एवर्टन मुख्य भूमिकेत असून अमोल पाराशर क्रांतिकारी भगत सिंहाच्या विशेष भूमिकेत आहे. भारत आणि जगभरातील २४० देशांत आणि प्रदेशांतील प्राईम मेंबर्स १६ ऑक्टोबर या दसऱ्यापासून ‘सरदार उधम’ पाहू शकतील.


हेही वाचा – Durga Pooja: दुर्गापूजेची सेलिब्रेटी स्टाईल